Young woman removing tattoo in Malegaon esakal
नाशिक

Tattoo Tending in Youth : तरुणाईचा टॅटु काढण्याकडे कल! गोंदण कलेच्या जागी टॅटूला पसंती

Latest Nashik News : अनेक दुकानदार टॅटू काढण्यासाठी इंचप्रमाणे दर आकारात आहेत. यात पाचशे ते सातशे रुपये आकारले जातात. सोशल मिडीयामुळे ग्रामीण भागात देखील टॅटू काढण्यासाठी गर्दी होते.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : एकेकाळी आदिवासी बांधव चेहऱ्यावर व हातावर गोंदत होते. त्याची जागा आता टॅटूने घेतली आहे. ग्रामीण भागात भरणाऱ्या यात्रा-जत्रेत याची झलक पहायला मिळते. (Nashik tattoo tending in Youth)

शहरात अनेक तरुण मुले, मुली हातावर मॉम, डॅड, त्रिशूळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो यासह अनेक नावे काढताना दिसतात. सुरवातीला चार ते पाच दुकाने होती. सध्या येथे पंधरा ते वीस दुकाने आहेत. अनेक दुकानदार टॅटू काढण्यासाठी इंचप्रमाणे दर आकारात आहेत. यात पाचशे ते सातशे रुपये आकारले जातात. सोशल मिडीयामुळे ग्रामीण भागात देखील टॅटू काढण्यासाठी गर्दी होते.

गणेशोत्सव, शिव जयंती, आंबेडकर जयंती, एकलव्य जयंती यासह विविध सणांमध्ये तरुण टॅटू काढण्यासाठी येतात. देवी, देवता व राष्ट्र पुरुषांच्या जयंतीच्या वेळी फोटो व नाव काढले जातात. येथे लहान मुलांसाठी तात्पुरते वाढदिवसाला भेट म्हणून मुलांना त्यांच्या हातावर छोटा भिम, कार्टून, डोरेमॉल, हातोडी कार्टून, बटरफ्लाय, स्टार यासह अनेक टॅटू काढून दिले जातात. महिलांकडून स्टार, ब्रेसलेट, मोरपिस, नाव यासह अनेक टॅटू काढताना महिला दिसत आहेत. टॅटू काढण्यासाठी सुई, रिप्स, कलर्स यासह अनेक साहित्य वापरले जाते. (latest marathi news)

येथे फोटो, डिझाईन, सिग्नेचर, कव्हर अप, मंडळारेह या प्रकारचे टॅटू काढण्याकडे तरुणाईचा कल आहे. यात १८ ते ४० वयोगटातील मुले, मुली, तरुणांचा समावेश आहे. येथील सटाणा रोड, कॅम्प, कॉलेज स्टॉप, सोमवार बाजार यासह अनेक भागात टॅटू काढण्याची दुकाने आहेत. दुकानदारांकडून नवनवीन टॅटू काढून देत असल्याने अनेक जण टॅटूच्या प्रेमात दिसत आहेत.

"एका दिवसात तीन ते चार टॅटू काढले जातात. अनेक मुलींचाही कल वाढत आहे. बहुतेक जण उजव्या हातावर पाच ते सहा इंचाचे काढत आहे. नाशिक, मुंबई, पुणे या मोठ्या शहरांपेक्षा मालेगावला कमी किमतीत टॅटू काढून दिले जाते. तेही उत्तम दर्जाचे असतात."

- राहुल आहिरे (राहुल टॅटू सेंटर, सटाणा नाका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT