Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : चुकीचे कामकाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; विविध विभागांतील 5 जणांचे निलंबन

Nashik News : जिल्हा परिषद प्रशासन चुकीचे कामकाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत ‘ॲक्शन मोड’वर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषद प्रशासन चुकीचे कामकाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. सोमवारी (ता. २७) विविध विभागांतील विविध कारणांनी पाच जणांचे निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले आहेत. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ग्रामपंचायत विभागाच्या दोन, बांधकाम विभागाच्या दोन, शिक्षण विभागाच्या तीन, तर आरोग्य विभागाच्या एकाचा समावेश आहे. (Nashik Zilla Parishad administration will take action against wrongdoers )

या कारवाईने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. दिंडोरी तालुक्यातील सहविचार सभेत दोन शिक्षकांची हाणामारी करतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. त्यावर निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. इगतपुरीतील वाडीवऱ्हे येथे मित्तल यांच्या भेटीत गैरहजर असलेल्या मुख्याध्यापकांचे निलंबन करण्यात आले आहे. वडनेरभैरव (ता. चांदवड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी वारंवार तक्रारी येत होत्या.

त्यानुषंगाने मित्तल यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाच्या चौकशीसाठी पथक नियुक्त केले होते. त्यांच्या अहवालामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असताना त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न कळवता गैरहजर असल्याचे आढळल्याचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्या होत्या. (latest marathi news)

त्यानुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील ग्रामसेवकाने यापूर्वी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत नागझरी/ हाताणे येथील दप्तर तपासणीसाठी दिलेले नव्हते. त्याचबरोबर ग्रामपंचायत निमशेवाडी येथील लेखापरीक्षण केलेले नाही. त्यामुळे त्याच्या निलंबनाचे आदेश मित्तल यांनी काढले आहेत.

सुरगाणा पंचायत समितीतील बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, त्याचे निलंबन करण्यात आले आहे. बागलाण पंचायत समिती येथील उपअभियंता यांच्याबाबत देखील काही आर्थिक कारणांवरून तक्रारी करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात संबंधित उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. या सर्व कारवाईबाबत मित्तल यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon :खडसेंच्या घरात चोरी! ५ तोळं सोनं आणि ३५ हजार लंपास; एकनाथ खडसे म्हणाले, जळगावात पोलिसांचा धाक राहिला नाही

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

UP Encounter: योगींच्या पोलिसांनी एका शहरात केले डबल एनकाऊंटर! तिघांच्या पायाला गोळी; गुन्हेगारीचा मोठा इतिहास!

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

Sugarcane Dispute : आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची ऊस वाहतूक रोखली, पोलिसांची अरेरावी; पोलिस निरिक्षकानेच आंदोलकांना दिल्या शिव्या...

SCROLL FOR NEXT