ZP Nashik esakal
नाशिक

Nashik : जिल्हा परिषदेच्या 100 कोटींच्या निधी वर संक्रांत

विक्रांत मते

नाशिक : राज्य शासनाकडून (state government) जिल्हा परिषदेला (ZP) प्राप्त झालेले एकूण निधीपैकी ४६ कोटी तर बीडीएस निधी (BDS Fund) हस्तांतराच्या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे जवळपास ५३ कोटी रुपयांचा निधी परत गेल्याने जिल्हा परिषदेच्या एकूण शंभर कोटींचा निधी वर संक्रांत कोसळली आहे. परिणामी पुढील वर्षी विकास कामांसाठी शासनाकडून नियोजन करताना निधीत कपात होण्याची भीती निर्माण झाली आहे. (Nashik Zilla Parishad Fund Nashik News)

महापालिका नगरपालिका आणि प्रमाणे जिल्हा परिषदेला स्व उत्पन्नाचे ठोस साधन नसते जे काही उत्पन्न मिळते तुटपुंजे नाशिक जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटमध्ये जवळपास ३७ कोटी रुपये स्व उत्पन्न प्राप्त होते उर्वरित ६५ टक्के उत्पन्न राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मिळते दरवर्षी निधी प्राप्त होत असल्याने ज्या त्या विभागांना मर्यादित वेळेत खर्चाचे बंधन असते तर जिल्हा परिषदेला निधी खर्चाची मर्यादा दोन वर्षांची असते इतर विभाग अखर्चिक निधी नियोजन समितीकडे वर्णन करतात शासनाकडे निधीचा परतावा झाल्यानंतर त्या पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन करताना विकास कामांचा निधी ची वजावट केली जाते त्यामुळे विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याने जिल्हा परिषदेच्या विकास कामांकडे निधी वळविला जातो.

शासनाच्या विविध विभागांना जवळपास ५३ कोटींचा निधी एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी बीडीएस स्लीप निघणे व बीड या प्रणालीवर निधी वितरित न झाल्याने शासनाकडे जमा झाला त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ४६ कोटी रुपयांचा निधी देखील शासनाकडे परत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे एकूण शंभर कोटी रुपयांच्या निधी शासनाकडे परत जाणार आहे.

आरोग्य विभागाचा आठ कोटींचा निधी

जिल्हा परिषदेच्या अखर्चिक राहिलेल्या ४६ कोटी रुपयांच्या एकूण निधीपैकी आरोग्य विभागाचे साडेआठ कोटी रुपयांचा निधी चा समावेश आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्यसेवा भक्कम करण्यासाठी राज्यातील इतर जिल्हा परिषद प्रयत्न करत असताना नाशिक जिल्हा परिषदेने मात्र आरोग्य सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. शासनाकडे जर निधी परत जात असेल तर नियोजनात कुठेतरी तूट असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT