Fund  esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे यंदा निधी नियोजन लांबणार; 18 जूननंतरच मुहूर्त लागण्याची चिन्हे

Nashik ZP News : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून नियतव्य मंजूर झाले आहे. मात्र, यंदा निधी नियोजन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून नियतव्य मंजूर झाले आहे. मात्र, यंदा निधी नियोजन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने सद्यःस्थितीत निधी नियोजन होऊ शकत नाही. ४ जूनला आचारसंहिता संपल्यावर नियोजन करण्याची प्रशासनाची तयारी होती. (Nashik Zilla Parishad this year Fund planning delayed)

परंतु, नाशिक शिक्षक मतदरासंघाची निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे १८ जूननंतरच निधी नियोजनाला मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर साधारण जिल्हा परिषदेला नियतव्य कळविण्यात येते. जिल्हा परिषदेचा ३१ मार्चनंतर तसेच ताळमेळ लागून अखर्चित निधी जमा केल्यानंतर जिल्हा नियोजनकडून एप्रिल-मेमध्ये विभागांना नियतव्य कळविले जात असते.

त्यानंतर मे-जूनअखेर संबंधित समित्यांना नियतव्य कळविले जाऊन निधीचे नियोजन केले जाते. दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून हे नियोजन केले जात आहे. यंदा जिल्हा परिषदेला नियतव्य कळविले गेले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. (latest marathi news)

त्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे. यामुळे निधी नियोजन होणार नाही. २० मेस मतदान प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता आहे. मात्र, आचारसंहिता शिथिल होणार की नाही, हे निश्चित नाही. त्यामुळे ४ जूनला निकाल घोषित झाल्यानंतरच आचारसंहिता शिथिल होणार आहे.

त्यानंतर साधारण प्रशासनाकडून निधी नियोजन होण्याची शक्यता होती. मात्र, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही जाहीर झाली आहे. या मतदारसंघासाठी १० जूनला मतदान असून, १३ जूनला मतमोजणी होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया १८ जूनला संपणार आहे. ही प्रक्रिया संपल्यानंतर आचारसंहिता अधिकृतपणे उठणार आहे. आचारसंहिता उठल्यानंतर प्रशासनाला निधीचे नियोजन करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT