Nashik ZP
Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेस 2 कोटी 15 लाखाचा नफा

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेस २०२३-२४ आर्थिक वर्षांत ५ कोटी १२ लाख ३६ हजाराचा ढोबळ नफा झाला. सर्व तरतुदी व आयकर वजा जाता निव्वळ नफा २ कोटी १५ लाख झाला आहे. १७ वर्षातील हा सर्वोच्च निव्वळ नफा असल्याचे बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे-पाटील व उपाध्यक्ष महेश मुळे यांनी सांगितले. बँकेची सभासद संख्या १५ हजार ६६१ असून, भागभांडवल २२ कोटी २४ लाख आहे. (Nashik ZP 2 crore 15 lakh profit to Employees Bank marathi news)

राखीव व इतर निधी २७ कोटी ५ लाख तर, एकूण ठेवी ३४८ कोटी ५५ लाख आहेत. बॅंकेने २५२ कोटी ६४ लाख कर्जवाटप केले असून, गुंतवणूक १२३ कोटी ९५ लाखांची आहे. एकूण व्यवसाय ६०१ कोटी १९ लाख, खेळते भांडवल ४०१ कोटी ६५ लाख, सीआरएआर १४ टक्के आहे. गतवर्षांपेक्षा ठेवीत १३ कोटी ८५ लाख, कर्जवाटपात २३ कोटी ४० लाख तर निव्वळ नफ्यात ४८.७० लाखाने वाढ झाली आहे. (latest marathi news)

एनपीए ३.५४ टक्के असून, निव्वळ एनपीए १.७७ टक्के आहे. या वेळी संचालक प्रमोद निरगुडे, नीलेश देशमुख, अजित आव्हाड, मंदाकिनी पवार, सुनील गिते, धनश्री कापडणीस, रवींद्र आंधळे, रवींद्र बाविस्कर, मोहन गांगुर्डे, ज्ञानेश्वर माळोदे, जयंत शिंदे, विजय देवरे, रमेश बोडके, अभिजित घोडेराव, सचिन विंचूरकर, विक्रम पिंगळे, अमोल बागूल, विनोद जवागे, भरत राठोड आदी उपस्थित होते.

''बँकेने कर्जवाटप करताना अतिशय कडक धोरण अवलंबिले असून नियमात बसत असेल इतकेच कर्ज सभासदांना मंजूर करून वितरित करण्यात येत आहे. सभासदांसाठी नियमित कर्ज २० लाख, चारचाकी वाहन कर्ज २५ लाख, शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ लाखांवरून १५ लाख, गृह कर्ज मर्यादा ५० लाख आहे.''- बाळासाहेब ठाकरे पाटील, अध्यक्ष, जि. प. सरकारी व परिषद कर्मचारी बँक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP : अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन उमेदवार विजयी; राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांनी केलं तिहार कारागृहात आत्‍मसमर्पण; म्हणाले, 'मी या हुकूमशाहीविरुद्ध...'

Gautam Gambhir: 'मला टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, कारण...', अखेर गंभीरने मौन स्पष्टच सांगितलं

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी बँकॉकला जाणार? बोर्डिंग पासचा व्हायरल झालेला फोटो 'Edited'

SCROLL FOR NEXT