Nashik ZP News esakal
नाशिक

Nashik ZP News : शिष्यवृत्तीचा टक्का वाढीसाठी शिक्षण विभाग सरसावला; जिल्हा परिषद शाळांमध्ये आतापासूनच घेणार सराव परीक्षा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या सुपर फिफ्टी उपक्रमात विद्यार्थी चमकत असताना प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याची कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या सुपर फिफ्टी उपक्रमात विद्यार्थी चमकत असताना प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याची कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग आतापासूनच सरसावला आहे. (ZP Education Department working to increase percentage of scholarship)

विभागातर्फे दर महिन्याला सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने झालेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीसाठीची परीक्षा ही यंदा १८ फेब्रुवारीला झाली होती.

परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ विद्यार्थी राज्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यात पाचवीच्या राज्य बोर्डाच्या ग्रामीण विभागाचे तीन तसेच आठवीच्या सीबीएसई-आयसीएसई विभागाच्या आठवीतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्य बोर्डाच्या शहरी विभागातून पाचवीचा एकही विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकलेला नाही.

इतर जिल्ह्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. गतवर्षी परीक्षेच्या पूर्वसंध्येला केवळ एकदाच सराव परीक्षा घेण्यात आली होती. (latest marathi news)

यंदा मात्र दर महिन्याला शाळांमध्ये सराव परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्याकरिता शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयारी केली जात आहे. ही यादी निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यांचे शाळा सुटल्यानंतर शिक्षक जादा तास घेतील.

या माध्यमातून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव करून घेतला जाणार आहे. याशिवाय विशेष तज्ज्ञ शिक्षकांचेही मार्गदर्शन दिले जाणार आहे. याबाबत सर्व शिक्षकांची बैठक घेतली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT