Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : कुशल-अकुशलचे प्रमाण राखण्यात अपयश; जिल्हा परिषद प्रशासनासाठी 4 तालुक्यांची डोकेदुखी

Nashik ZP : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अकुशल व कुशल कामांचे प्रमाण ६०:४० राखणे बंधनकारक असते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अकुशल व कुशल कामांचे प्रमाण ६०:४० राखणे बंधनकारक असते. राज्य स्तरावर हे प्रमाण ६६:३४ असे असताना नाशिक जिल्ह्यातील चांदवड, नांदगाव, मालेगाव व देवळा या चार तालुक्यांमुळे जिल्ह्याचे अकुशल-कुशल कामांचे प्रमाण वर्षाखेरीस ५७:४३ असे झाले आहे. कुशल कामांचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत राखणे बंधनकारक असताना नाशिक जिल्हा परिषदेला हे प्रमाण राखण्यात अपयश आले आहे. (Nashik ZP Failure to maintain skilled unskilled ratio marathi News )

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील अकुशल नागरिकांना वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा असला, तरी या योजनेतून अनेक कुशल कामेही केली जातात. यामुळे कामांचे नियोजन करताना अकुशल व कुशल कामांचे प्रमाण ६०:४० राखणे बंधनकारक केले आहे.

अकुशल मजूर व कुशल मजूर, यंत्रसामग्री, वस्तू खरेदी यांच्या खर्चाचे प्रमाण ६०:४० राखण्याची जबाबदारी ग्रामपंचात, तालुका, जिल्हा पातळीवर तसेच राज्य पातळीवर राखणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेतील अकुशल व कुशल कामे मिळून २०२३-२४ या वर्षात १२७ कोटींची कामे करण्यात आली असून, या कामांतून २५ लाख ६० हजार १६५ दिवस मनष्यदिवस रोजगार निर्मिती करण्यात आली आहे. (latest marathi news)

जिल्हा परिषदेने या वर्षात २१ लाख ८२ हजार ५१२ मनुष्यदिवस रोजगाराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असताना प्रत्यक्षात ११७ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. अकुशल मनुष्यबळ रोजगारनिर्मिती केल्याची या मजुरांना ७२.२१ कोटी रुपये मजुरी द्यावी लागली आहे. त्याचवेळी कुशल मजूर, कुशल कामांसाठी सामग्री खरेदी व प्रशासकीय कामकाजासाठी ५४.८० कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे प्रमाण ६०:४० राखणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात ते ५७:४३ झाले आहे.

जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये अकुशल व कुशलचे प्रमाण राखण्यात चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा या चार तालुक्यांना अपयश आले आहे. कुशल कामे जास्तीत जास्त ४० टक्के करण्याची मर्यादा असताना चांदवड तालुक्यात कुशल कामांचे प्रमाण ६८ टक्के आहे. मालेगाव तालुक्यात ते प्रमाण ५४ टक्के, नांदगाव तालुक्यात ६४ टक्के व येवला तालुक्यात ते प्रमाण ५६ टक्के आहे.

इतर दहा तालुक्यांमध्ये अकुशल कामांचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कुशल कामांसाठी तीन टक्के अधिक खर्च झाल्याने रोजगार हमी कायद्याचा भंग झाला असून, ही बाब जिल्हा परिषद प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Disruption : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई-ठाणे लोकल रेल्वेसेवा खोळंबली, प्रवाशांचे प्रचंड हाल

Kolhapur Crime News : डॉक्टर मुलीने ७८ वर्षीय वडिलांना चावून बोटचं तोडलं, छातीवर लाथ मारली अन्; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

आनंदाची बातमी ! धावत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, हेल्पलाइनवरून परत मिळवा; साखळी खेचल्यास हाेणार दंड; मदतासाठी काय करावा लागणार?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

SCROLL FOR NEXT