payment esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. ची 200 कोटींची देयके रखडली!

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : आर्थिक वर्ष संपून दोन आठवडे होवूनही जिल्हा कोषागार विभागाने मागणीनुसार तयार करून ठेवलेले धनादेश वितरित केले नाहीत. पुढील सूचना येईपर्यंत हे धनादेश संबंधित यंत्रणांना देऊ नयेत, अशा सूचना जिल्हा कोषागार विभागाला असल्याचे समजते.

यामुळे नाशिक जिल्हा परिषदेचे जवळपास दोनशे कोटींची देयके रखडली आहेत. (Nashik ZP News 200 crore payments stopped)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सुरवातीला मार्चअखेरचे कारण देत जिल्हा कोषागार कार्यालयाने केवळ बीडीएसद्वारे निधी वितरित करण्यावर लक्ष दिले व मार्च संपल्यानंतर जिल्हा परिषद व इतर कार्यान्वयीन यंत्रणांकडून आलेल्या देयकांच्या प्रस्तावांची तपासणी करून त्याप्रमाणे धनादेश तयार केले.

मार्च अखेरपर्यंत प्राप्त झालेल्या जवळपास दोनशे कोटींच्या १९०० देयक प्रस्तावांचे चार हजारांच्या आसपास धनादेश तयार करण्यात आले आहेत. संबंधित विभागांनी एप्रिलचा पहिला आठवडा उलटल्यानंतर जिल्हा कोषागार कार्यालयाकडे धनादेशाची मागणी केली.

मात्र, जिल्हा कोषागार कार्यालयाकडून धनादेश देण्यास नकार देण्यात आल्याचे समजते. तशा सूचना मंत्रालयस्तरावरून आल्याचे समजते. दरवर्षी मार्चअखेरनंतर एप्रिलमध्ये तातडीने धनादेश दिले जातात. मात्र, यंदा हे धनादेश रोखल्यामुळे संबंधित सर्वांनाच याचे आश्‍चर्य वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: जळगाव जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरला

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT