Chief Executive Officer Ashima Mittal during the Health Department's Smart Health Center meeting in Zilla Parishad. District Health Officer in-charge Dr. Rajendra Bagul. esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात ऑनलाइन केसपेपर

Nashik ZP : शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आता ४० आरोग्य केंद्रांत ऑनलाइन रुग्णांचा केसपेपर काढला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आता ४० आरोग्य केंद्रांत ऑनलाइन रुग्णांचा केसपेपर काढला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या चांदवड तालुक्यातील उसवाड व सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली आरोग्य केंद्रात सुरू केलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे स्मार्ट आरोग्य केंद्रात मोबाईल अॅपद्वारा केसपेपर काढला जाणार आहे. (Nashik ZP Online Case Paper in District Health Centre marathi news)

स्मार्ट अंतर्गत आरोग्य व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सुविधा, त्याचबरोबर भौतिक सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मित्तल यांनी बुधवारी (ता. १०) सर्व स्मार्ट आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकत्रित आढावा बैठक घेतली. बैठकीस प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते व डॉ. दीपक लोणे उपस्थित होते. (latest marathi news)

स्मार्ट उपक्रमात निवड झालेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक असावे, तसेच रुग्ण कल्याण समितीच्या बैठका या नियमित घेण्यात याव्यात, आरोग्य विभागाच्या ई- सुश्रुत प्रणालीचा वापर हा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात करून मोबाईल अॅपद्वारे केसपेपर (स्कॅन अॅण्ड शेअर) या पद्धतीने आरोग्य समस्यांविषयी रुग्णांना समुपदेशन उपलब्ध करून द्यावे अशा सूचना या वेळी केल्या.

कायाकल्प व राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन (NQAS)मधील सर्व बाबींचा समावेश करून स्मार्ट उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या कायाकल्प उपक्रमांतर्गत उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ४० पैकी १८ स्मार्ट आरोग्य केंद्रांचा समावेश झाला होता. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भौतिक व आरोग्य सुविधा वाढविण्यात याव्यात व सर्व आरोग्य केंद्रांचा कायाकल्प करण्यात यावा, असे आवाहन या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बागूल यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT