Nashik ZP esakal
नाशिक

Nashik ZP News : सुट्यांमध्ये प्राथमिक शाळांची डागडुजी; प्राथमिक, माध्यमिक शाळांना 43 दिवस उन्हाळी सुट्या

Nashik ZP : शालेय स्तरावरच्या वार्षिक परीक्षा आटोपल्या आहेत. २ मे महिन्यात निकाल लागणार असून, त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्या लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : शालेय स्तरावरच्या वार्षिक परीक्षा आटोपल्या आहेत. २ मे महिन्यात निकाल लागणार असून, त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्या लागणार आहे. यंदा प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांना ४३ दिवस उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. या सुट्यांमध्ये प्राथमिक शाळांची दुरुस्ती, मॉडेल स्कूल यांसह वर्षभरातील कामांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली. ( Renovation of primary schools during vacations)

सन २०२४-२५ या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्या आधीच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना १ मे महाराष्ट्र दिवस साजरा झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवसांपासून उन्हाळी सुट्या लागणार आहेत. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता काही भागात २६ जूनपासून शाळा सुरू होतील.

नाशिक जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा सुरू होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने उन्हाची तीव्रता लक्षात घेता उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन केले आहे. २ मेपासून माध्यमिक शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार आहेत. शिक्षकांना उन्हाळी सुट्या रविवार पकडून असणार आहेत. (latest marathi news)

२०२३-२४ या शैक्षणिक सत्राचा अखेरचा दिवस १८ असणार आहे. याशिवाय एकूण ७६ सुट्ट्यांचे नियोजन जानेवारी महिन्यात मुख्याध्यापकांसह शिक्षक यांनी केलेले आहे. विद्यार्थ्यांना उपस्थितीची सवलत दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. परीक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास २२ एप्रिलपासून सवलत देण्यात आलेली आहे.

तसेच १९ एप्रिल रोजी शालेय शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी संयुक्त पत्र जारी केलेले आहे. गतवर्षी शाळा दुरुस्तीसह खोल्या बांधकामाचे नियोजन वेळात न झाल्याने निधी अखर्चित राहिला होता. त्यामुळे यंदाच्या सुट्यांमध्ये शाळा दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य देण्याचे नियोजन आहे. याशिवाय नवीन वर्ग खोल्या बांधकाम हे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यासाठी काम केले जाणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT