zp schools esakal
नाशिक

Nashik ZP Schools: शाळा बांधकामाचे 25 कोटी पडून; साडेआठ कोटींचे नियोजनही रखडले

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Schools : जिल्हा परिषदेच्या ४४१ शाळांची दुरवस्था झाली असून, या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जीव मुठीत बसून शिक्षण घेत असल्याबाबत ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले.

दुसरीकडे, वर्गखोल्या बांधकामासाठी प्राप्त निधी खर्चाविना पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या २० कोटींपैकी तब्बल साडेसतरा कोटी रुपये अखर्चित आहेत.

पुनर्विनियोजनातून आलेल्या साडेआठ कोटी रुपयांच्या निधीतील कामांचे नियोजन झालेले नाही. २०२१-२२ या वर्षात निधी प्राप्त होऊनही जवळपास दहा कोटींची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे समोर आले आहे. (Nashik ZP Schools 25 crore for school construction Works worth ten crores also incomplete)

जिल्हा परिषदेच्या तीन हजार २६१ शाळा आहेत. यात सुमारे दोन लाख ७८ हजार ७९१ विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, यातील ४४१ शाळांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी शाळांच्या भिंती पडल्या.

अनेक शाळांच्या संरक्षण भिंती जमीनदोस्त झाल्या असून, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागाही नाही. शाळांची अशी गंभीर परिस्थिती युडायसवर भरलेल्या माहितीतून पुढे आली आहे.

या नादुरुस्त शाळांकरिता निधीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींकडून निधीची मागणी केली असता त्यांना प्रतिसाद मिळत नाही.

मात्र, दुसरीकडे जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीतून नवीन वर्गखोल्या उभारण्याचे नियोजन करूनही तो निधी वेळेत खर्च झालेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निधीची ओरड अन कामांकडे दुर्लक्ष

शिक्षण विभागाला नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून २०.२४ कोटी रुपये नियतव्यय कळविले होते. या निधीतून दायित्व वजा जाता शिक्षण विभागाने १७.४३ कोटींच्या निधीतून जवळपास १७५ वर्गखोल्यांना मंजुरी दिली.

मात्र, या निधीतून अद्याप एकही काम पूर्ण झालेले नाही. त्याचप्रमाणे पुनर्विनियोजनातून जिल्हा परिषदेला ३१ मार्च २०२३ ला ८.४३ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यातून ४९ वर्गखोल्या मंजूर झाल्या आहेत.

याशिवाय, २०२१-२२ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या दहा कोटींच्या जवळपास १०० वर्गखोल्यांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. एकीकडे वर्गखोल्यांसाठी पुरेसा निधी नसल्याची ओरड होत असली, तरी प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या निधीतून वेळेत काम करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उदासीनता दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT