fund esakal
नाशिक

Nashik ZP Sport Competition : कर्मचारी क्रीडा स्पर्धा निधीत तिपटीने वाढ; जि.प. अध्यक्ष चषक स्पर्धेला मात्र ठेंगा

ZP Sport Competition : जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेल्या निधीत तीन वर्षांत तिपटीने वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Sport Competition : जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेल्या निधीत तीन वर्षांत तिपटीने वाढ झाली आहे. गतवर्षी या स्पर्धांसाठी केलेली १८ लाखांची तरतूद, यंदाच्या अंदाजपत्रकात थेट २५ लाख केली आहे. या क्रीडा स्पर्धेच्या रकमेत वाढ करताना दुसरीकडे जि.प. अध्यक्ष चषक स्पर्धेच्या निधीत कोणतीही वाढ झालेली नाही. (Nashik ZP Sport Triple increase in employee sports competition fund marathi news)

त्यामुळे प्रशासनाचा प्राधान्यक्रम नेमका कोणता, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा होते. या स्पर्धांसाठी अंदाजपत्रकात प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत निधीची तरतूद केली जाते. (latest marathi news)

आजवर या स्पर्धेतून जिल्हा, राज्यस्तरीय खेळाडू तयार झाले आहेत. त्यामुळे पदाधिकारी, सदस्य या स्पर्धेसाठी निधीच्या तरतुदीत वाढ करतात. प्रशासकीय राजवट असल्याने गत तीन वर्षांपासून या स्पर्धेसाठी २० लाखांची तरतूद केली जात आहे. यात कोणतीही वाढ झालेली नाही.

याउलट, जि. प. अधिकारी, कर्मचारी यांच्या स्पर्धेसाठी असलेल्या तरतुदीत प्रशासनाकडून भरघोस वाढ केली जात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी सन २०२४-२५ च्या अंदाज पत्रकात तब्बल २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे तीन वर्षांत या निधीच्या तरतुदीत मोठी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या अध्यक्ष चषक स्पर्धेसाठी निधीत वाढ नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT