Nashik ZP esakal
नाशिक

Nashik ZP Sports Competition : क्रीडा स्पर्धेत अंदाजपत्रकाचा ‘खेळ’; जिल्हा परिषदेत महोत्सवास सुरवात

ZP Sports Competition : जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सवास सुरवात झाली असून, यात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सादर होणाऱ्या अंदाजपत्रकाचा मात्र ‘खेळ’ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Sports Competition : जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सवास सुरवात झाली असून, यात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सादर होणाऱ्या अंदाजपत्रकाचा मात्र ‘खेळ’ होत आहे. लेखा व वित्त विभागाकडून तयार झालेले अंदाजपत्रक सादर करण्यासाठी सतत वेळ बदलली जात आहे. गुरुवारी (ता. २२) हे अंदाजपत्रक सादर होणार होते. ()

मात्र, ते एक दिवस पुढे म्हणजे शुक्रवारी (ता. २३) सादर होणार असल्याचे जाहीर केले. आता ते पुन्हा पुढे ढकलण्यात आले असून, २७ फेब्रुवारीला सादर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठका असल्याचे कारण देण्यात आले आहे.

मार्च एंडची गर्दी त्यातच कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निधी खर्चासाठी धावपळ असताना जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा घाट प्रशासनाने घातला आहे.

यातच अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांना सुरवात झाली आहे. आचारसंहिता लागणार असल्याने तसेच निधी खर्चाची लगभग असल्याने तत्पूर्वी अंदाजपत्रक सादर होणे आवश्यक असल्याने ते सादर करण्याचे निर्देश होते. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून लेखा व वित्त विभागाने अंदाजपत्रक सादर करण्याची तयारी सुरू करत कामकाज केले.

सर्व विभागप्रमुखांच्या बैठका घेतल्या. मागणी, खर्च यांचा ताळमेळ बसविला. त्यानुसार अंदाजपत्रक तयार केले. मात्र, ते सादर करण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे. अंदाजपत्रक सादर करण्यासाठी गुरुवार निश्चित झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन अंदाजपत्रकाबाबत चर्चाही केली.

मात्र, क्रीडा स्पर्धांची तयारी, बैठका, व्हीसी यामुळे ते शुक्रवारी सादर केले जाईल, असे ऐनवळी सांगण्यात आले. त्यासाठी संबंधित विभागाने अजेंडा काढत, सर्व तयारीही केली. मात्र, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत विविध बैठका होणार आहेत.

त्यामुळे प्रशासनाने शुक्रवारी अंदाजपत्रक सादर करण्याचे रद्द केले. आता अंदाजपत्रक सादर करण्यासाठी मंगळवारचा (ता. २७) मुहूर्त काढला आहे. जिल्हा परिषदेच्या दृष्टीने अंदाजपत्रक महत्त्वाचे असून, वर्षभरातील जमा-खर्च यात मांडला जातो. परंतु त्याचा खेळ होत असल्याची चर्चा आहे. मंगळवारी तरी अंदाजपत्रक सादर होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : महादेव जानकर, राजू शेट्टींनी घेतली आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT