New Year Party  Sakal
नाशिक

New Year 2024 : सरत्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्‍ज; हॉटेल व्‍यवस्‍थापनाकडून जय्यत तयारी

वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेले असताना सरत्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्‍ज झाले आहेत. हॉटेल व्‍यवस्‍थापनाने नवीन वर्षाच्‍या स्‍वागताची तयारी केलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

New Year 2024 : वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेले असताना सरत्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्‍ज झाले आहेत. हॉटेल व्‍यवस्‍थापनाने नवीन वर्षाच्‍या स्‍वागताची तयारी केलेली आहे.

त्‍यामुळे आउटींग, हॉटेलिंगने थर्डी फर्स्टची सायंकाळ रंगणार असून, खवय्यांना विशेष मेन्‍यूतील पदार्थांचे मेजवानी चाखायला मिळणार आहे.(Nashikkar ready to bid farewell to new year 2024 nashik news)

सण-उत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर शहरात पर्यटकांची मांदियाळी असताना, नाशिककरांकडूनही आउटींगचा आनंद लुटला जात असतो. अगदी एखाद्या उत्‍सवाप्रमाणे असलेल्‍या थर्डी फर्स्टनिमित्त शहर परिसरात उत्‍साह बघायला मिळतो आहे. नाताळपासून सुरू झालेला हा जल्‍लोष येत्‍या शनिवार (ता. ३१) पर्यंत चालणार आहे. हॉटेल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आलेली असून, अनेक ठिकाणी सेल्‍फी पॉइंट उभारण्यात आले आहेत.

पार्टीचे नियोजन, संगीताचा थरार

नागरिकांचा उत्‍साह लक्षात घेता शहरातील काही हॉटे‍लकडून थर्टी फर्स्ट पार्टीचे नियोजन केले आहे. या पार्टीमध्ये थिरकविणारे संगीत, लज्‍जतदार पदार्थ, शीतपेये यासाठी एक रक्‍कमी प्रवेशिका विक्री केली जाते आहे.

त्‍यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकांकडून कुटुंबासाठी प्रवेशिका खरेदी केल्‍या जाता आहेत. अनेक हॉटेलमध्ये विशेष मेन्‍यू तयार करण्यात आला आहे. यामध्ये चमचमीत, तिखट खाद्यपदार्थ यांच्‍यासह गोडधोड पदार्थांची भुरळ आत्तापासून खवय्यांमध्ये बघायला मिळते आहे.

क्षणचित्र...

- रविवारची सुटी असल्‍याने चाकरमान्‍यांचा आनंद द्विगुणित

- सकाळच्‍या मिसळ पार्टीपासून रात्रीच्‍या डिनर पार्टीचे नियोजन

- आउटींगची नाशिककरांकडून जोरदार तयारी

- अनेकांकडून हाउसिंग सोसायटी, अपार्टमेंटमध्ये पार्टीचे नियोजन

- युवा वर्गामध्ये अमाप उत्‍साह, समुहासह नियोजन

- महिलांच्‍या समुहाकडून किटी पार्टी, मनोरंजनात्‍मक कार्यक्रम

''वाइन कॅपिटल ऑफ इंडिया म्‍हणून ओळख असलेल्‍या नाशिकमध्ये नाताळापासूनच पर्यटकांच्‍या संख्येत वाढ होत असते. थर्टी फर्स्टपर्यंत ही गर्दी कायम राहणार असून, निसर्गाच्‍या सानिध्यात वाईनरीमध्ये नवीन वर्षाचे स्‍वागत करण्याचे अनेकांकडून नियोजन आखले जाते आहे. आम्‍हीदेखील पर्यटक, नाशिककरांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज आहोत.''- मोनित ढवळे, वरिष्ठ उपाध्यक्ष, सुला विनियार्डस्‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT