Ishwari Savkar esakal
नाशिक

Nashik Sports : Sri Lanka पाठोपाठ, India A वरील विजयात नाशिकची ईश्वरी सावकार प्रभावी!

अरूण मलाणी

नाशिक : श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील इंडिया बी संघातर्फे सलामीला फलंदाजीला येत प्रभावी कामगिरी करतांना इंडिया ए वरील विजयात मोठा वाटा उचलला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चौरंगी मालिका सध्या वायझॅग इथे सुरू आहे.

त्यात दुसर्‍या सामन्यात ईश्वरीच्या इंडिया बी संघाने इंडिया ए ने दिलेल्या ११७ धावांचे आव्हान १७.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. त्यात ईश्वरी सावकारने केवळ ३२ चेंडूत ६ चौकारांसह ३६ धावांचे बहुमोल योगदान दिले .सलामीला फलंदाजी करणारी ईश्वरी धावचीत झाली तेव्हा संघाच्या १०.१ षटकात ५४ धावा झाल्या होत्या. (Nashiks Eshwari Savkar impressive in victory over sri lanka & India A Nashik Sports News)

त्याधीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवरील विजयात देखील ईश्वरी सावकारने मोठा वाटा उचलला . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चौरंगी मालिका सध्या वायझॅग इथे सुरू आहे. त्यात पहिल्या सामन्यात ईश्वरीच्या इंडिया बी संघाने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १२५ धावा केल्या.

त्यात ईश्वरी सावकारने ४८ चेंडूत ३० धावांचे बहुमोल योगदान दिले . ईश्वरीने जी त्रिशा बरोबर दुसर्‍या गड्यासाठी ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली व संघाच्या धावसंख्येला आकार दिला. उत्तरदाखल श्रीलंका संघ ९ बाद ११३ पर्यंतच मजल मारू शकल्यामुळे इंडिया बी संघाने १२ धावांनी विजय मिळवला . इंडिया बी चा यानंतर १७ नोव्हेंबरला वेस्ट इंडीज बरोबर सामना नियोजित आहे.

ईश्वरीच्या ह्या प्रभावी कामगिरीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात उत्साहमय वातावरण निर्माण झाले असून, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी ईश्वरी सावकारला स्पर्धेतील पुढील सामन्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT