नाशिक

योग्य मार्गदर्शक होण्यासाठी शिक्षकांनी समृद्ध होणे गरजेचे

CD
NSK26H31501 जळगाव : रोटरी क्लब जळगावतर्फे आयोजित नेशन बिल्डर ॲवॉर्ड वितरण सोहळ्यात सन्मानित शिक्षकांसोबत प्रा. शरदचंद्र छापेकर, सुरेश केसवानी, ॲड. हेमंत भंगाळे, स्वाती ढाके व मान्यवर. योग्य मार्गदर्शक होण्यासाठी समृद्ध होणे गरजेचे प्रा. छापेकर : ‘रोटरी’तर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर ॲवॉर्डने सन्मान" सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : विद्यार्थ्यांना घडविताना शिक्षकांनी योग्य मार्गदर्शकाची भूमिका बजावण्यासाठी स्वतःचे ज्ञान व अनुभव समृद्ध करणे गरजेचे आहे. शिक्षक हा सतत शिकणारा विद्यार्थी असून त्याने निरंतर अध्ययन व साधना केली पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त उपप्राचार्य प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी केले. गणपतीनगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी रोटरी डिस्ट्रिक्ट नेशन बिल्डर ॲवॉर्ड समितीचे सदस्य सुरेश केसवानी, अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके उपस्थित होते. " कार्यक्रमात ग्रामीण भागातील शिक्षक प्रशांत देसले (ममुराबाद), शरद पाटील (ममुराबाद), वासुदेव महाजन (धानोरा), राहुल जाधव (उपखेडा, ता. चाळीसगाव), मंगला नारखेडे (असोदा) आणि अर्चना मोरे (देवळी, ता. चाळीसगाव) यांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षकांच्या वतीने वासुदेव महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व सन्मानित शिक्षकांचा कार्यपरिचय लिटरसी कमिटीच्या चेअरमन विनया जोशी यांनी करून दिला. वक्त्यांचा परिचय सुधीर पाटील यांनी करून दिला. सुभाष अमळनेरकर यांनी आभार मानले. चौकट ‘शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावे’ प्रा. छापेकर म्हणाले, की विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी बळ देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. दैनंदिन कामकाज सांभाळतानाच शिक्षकांनी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. बदलत्या काळात शिक्षकांसमोर अनेक आव्हाने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)सारखे तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात येत असल्याने शिक्षकांनीही तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT