kho kho esakal
नाशिक

SSC Result: मैदानावर सराव, अन् मैदानावरच अभ्यास; राष्ट्रीय खो-खोपटू चमकले

अरूण मलाणी

नाशिक : कुठलीही शिकवणी न लावता मैदानावर खो- खो सराव करताना मिळेल तेव्‍हा अभ्यास सुरु ठेवला. सकाळ व सायंकाळच्‍या सत्रात सरावानंतर अभ्यासासाठी आवर्जून वेळ दिला. या माध्यमातून प्रबोधिनीच्‍या खेळाडूंनी (Kho Kho Players) हसत खेळत दहावीची परीक्षा दिली. नुकताच जाहीर झालेल्‍या निकालात (SSC Results) या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. (national Kho Kho players shine in SSC exams Nashik News)

या खेळाडूंनी तर अगदी निरागसपणे परीक्षेचा सामना केला. सोबत त्‍यांच्‍या पालकांचीदेखील कमाल राहिली. आपल्‍या पाल्‍याची दहावीची परीक्षा आहे म्‍हणून ना कुठल्‍या पालकाने महिन्‍याभराची रजा टाकली ना या मुलांना महागडे क्‍लास लावले. मुक्‍तछंदपणे आपल्‍या पाल्‍याला खेळात लक्ष केंद्रित करू देत मोकळीक दिली. या खेळाडूंनीदेखील खेळा इतकीच अभ्यासावर निष्ठा ठेवताना परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. प्रबोधिनीच्‍या राष्ट्रीय खेळाडू सरीता दिवा (७२. ६०), निशा वैजल (८१), सोनाली पवार (७६. २०) यांच्‍यासह दीदी ठाकरे (८१. ४०), ऋतुजा सहारे (७७), ज्योती मेढे (६७. ८०), दीक्षा सिताड (६९. ८०), जना घुटे (६०. ६०) यांनी यशस्‍वी कामगिरी केली आहे. या यशस्‍वी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन नाशिक जिल्हा खो- खो असोसिएशन, संस्कृती नाशिक आणि समर्पण संस्‍थेच्‍या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT