धुळे : टुडे पान २ साठी... अँकर
--
फोटो क्रमांक : 34124, 34125
धुळे : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मनपा सभागृहात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेताना अधिकारी, कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात अभय विद्यालय व आझादनगर पोलिस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात शपथ घेताना मुख्याध्यापक संजय पवार, पोलिस निरीक्षक विनोद पाटील, विद्यार्थी, आदी.
--
धुळ्यात राष्ट्रीय एकता दिनी विविध उपक्रमांनी वेधले लक्ष
--
सरदार पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता रॅलीसह अभिवादन; एकात्मतेचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त शहरात राष्ट्रीय एकता दिन व राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त महापालिका सभागृहात अभिवादनसह शपथग्रहण सोहळा पार पडला. तर विविध शाळा आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात राष्ट्रीय एकता रॅली काढून नागरिकांमध्ये सामाजिक सलोखा, एकात्मतेचा संदेश दिला.
-
धुळे महानगरपालिका
महापालिकेच्या सभागृहात दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थितांनी देशाची अखंडता, सुरक्षा, बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय एकता दिनाची विशेष शपथ घेतली. नगरसचिव मनोज वाघ, सहायक आयुक्त राजेंद्र माईनकर, लेखापाल नितीन पाटील, पंकज शर्मा, संजय मोरे, चंद्रकांत मोरे, डॉ. योगेश पाटील, अभिजीत पंचभाई, मनोज चौधरी, काळू साबळे, शुभम जाधव, जयेश देवरे, नरेश अटलानी, नरेंद्र बाविस्कर, नंदू सोनवणे, कैलास मासाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
-
अभय विद्यालय
अभय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि आझादनगर पोलिस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता रॅली काढली. मुख्याध्यापक संजय पवार यांच्या मार्गदर्शनात उपक्रम पार पडला. एम. ए. पाटील यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व विशद केले. आझादनगरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, कर्मचारी राकेश खांडेकर उपस्थित होते. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत कॉलनी परिसरातून नागरिकांमध्ये सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
-
जिजामाता कन्या विद्यालय
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात धुळे शहर पोलिस ठाण्याच्या समन्वयाने राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य अपर्णा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी विविधतेतून एकतेकडे हा संदेश देणारे आकर्षक फलक लेखन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी एकात्मता दौड, समूहगीत व एकता शपथ घेतली. उपमुख्याध्यापक जे. जी. बागूल, पर्यवेक्षक पी. एस. देसले उपस्थित होते. एम. व्ही. मगर यांनी सूत्रसंचालन केले. आर. पी. बोरसे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.