Protest esakal
नाशिक

Nashik Protest News : प्रस्तावित टाकसाळीविरोधात देशभर आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Protest News : प्रेस महामंडळातर्फे गुजरातमध्ये उभारण्यात येणार असलेल्या प्रस्तावित सोन्याच्या नाण्याच्या टाकसाळीविरोधात सध्या अस्तित्वात असलेल्या केंद्र शासनाच्या विविध टाकसाळींतील कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Nationwide agitation against proposed new gold coin nashik news)

नाशिक रोड येथील प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाशिवाय इतर सगळ्या युनिटमधील संघटना या मुद्यावर एकवटल्या आहेत. केंद्रातर्फे गुजरातमध्ये सोन्याचे गाळप करून नवीन नाणे तयार करण्याचा कारखाना काढण्याचे नियोजन आहे.

त्यासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू आहे, त्याला विरोध करीत टाकसाळीतील कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. .

त्या टाकसाळींना काम मिळत नाही, त्यात नाणे पाडण्याच्या यंत्रणा अस्तित्वात असताना त्याचे विस्तारीकरण करण्याऐवजी नवीन टाकसाळ काढण्याला देशभरातून आक्षेप आहे.

त्याविरोधात हैदराबाद सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉइज युनियन, टाकसाळ मजदूर सभा (मुंबई), मिंट श्रमिक संघ (नोएडा), बँक नोट प्रेस मुद्रणालय कर्मचारी काँग्रेस इंटक (देवास), एम. पी. एम कर्मचारी युनियन (मध्य प्रदेश), टाकसाळ कर्मिका संघ (हैद्रराबाद) कोलकता मिंट एम्प्लॉइज युनियन (कोलकता) आदी संघटनांनी प्रेस महामंडळाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, देशातील वित्त मंत्रालयातील सर्व कामगार संघटना या मुद्यावर एकत्र आल्या असताना नाशिक रोड येथील प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघ मात्र तटस्थ आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT