नाशिक

नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

CD
नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार जाहीर निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते गुरूवारी वितरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी सोमवारी (ता. २) पत्रकार परिषदेत केली. या वेळी प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष महेश डोकफोडे, खजिनदार ईश्र्वर जगताप, सहकार्यवाह विजय शिंगणे उपस्थित होते. सदर पुरस्कारांचे वितरण गुरूवारी (ता. ५) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी साडे पाचला बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते होईल. पुरस्कारांचे अकरावे वर्ष असून सुरवातीला ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात पहिल्या आलेल्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. -- असे आहेत पुरस्कारर्थी (पुरस्काराचे स्वरूप : दोन हजार रुपये व स्मृतीचिन्ह) -दत्ता भट स्मृती पुरस्कार (अभिनय पुरुष) : एकनाथ सातपूरकर -शांता जोग स्मृती पुरस्कार (अभिनय स्त्री) : वृषाली कुलकर्णी -प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन) : राजेश जाधव -नेताजी भोईर स्मृती पुरस्कार (लेखन) : देवेन कापडणीस -रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार (नेपथ्य) : राजेंद्र जाधव चारुदत्त दीक्षित स्मृती पुरस्कार (संगीत) : अतुल गांगुर्डे -बापूसाहेब काळसेकर स्मृती पुरस्कार (रंगभूषा) : ललित निकम -पुरोहित स्मृती पुरस्कार (बालरंगभूमी) : पूनम पाटील -जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) : शैलेंद्र तनपुरे -रामदास बरकले स्मृती पुरस्कार (लोककलावंत) : राजेश शर्मा -शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार (शाहीर पुरस्कार) : प्रा. प्रवीण जाधव -वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार (सामाजिक व सांस्कृतिक) : बाळासाहेब शिंदे ------- -रंगतपस्या पुरस्कार : अभिनेते अक्षय मुडावतकर (अकरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह) ------- -रंगनायिका पुरस्कार : मानसी मारू -रंगनायक पुरस्कार : अमोल थोरात -रंग दिग्दर्शन पुरस्कार : वरुण भोईर (पंधरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह) ------- -सर्वोत्कृष्ट रंगसंघ पुरस्कार (प्रथम) : विजय नाट्य मंडळ -सर्वोत्कृष्ट रंगसंघ पुरस्कार (द्वितीय) : परिवर्तन बहुद्देशीय संस्था (दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह) ------- विशेष योगदान पुरस्कार : लक्ष्मण सावजी (सामाजिक), सचिन जोशी (शैक्षणिक), पल्लवी कदम (सांस्कृतिक), मनोहर नेटावणे (दिव्यांग लोककलावंत), श्रीया तोरणे (चित्रपट) -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rising Stars Asia Cup साठी भारतीय संघाची घोषणा! तिलक वर्मा कर्णधार, तर अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशचाही समावेश

Narendra Modi: जागतिक ऊर्जा संकटाचा भारतावर प्रभाव का पडला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Pune Road Accident: शिरूरमध्ये भीषण अपघात! अष्टविनायक महामार्गावर मोटारीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू; ओव्हरटेकचा प्रयत्न ठरला जीवघेणा

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक; राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक, सुनील तटकरेंची माहिती

Life Abroad: भारतात घर घेणे अवघड असलेल्यांना विदेशात व्हिला अन् महागड्या गाड्या कशा घेता येतात?

SCROLL FOR NEXT