नाशिक

नवापूरची नळपाणीपुरवठा योजना एमआयडीसीसाठी नाही!

CD
(पान १ ला मेन) फोटो : NSK26H34752 (आमदार चंद्रकांत रघुवंशी) --------- नवापूरची नळपाणीपुरवठा योजना ‘एमआयडीसी’साठी नाही आमदार चंद्रकांत रघुवंशी; विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ८ : नवापूर शहरासाठी मंजूर करण्यात आलेली ९३.१३ कोटी रुपयांची नवीन नळपाणीपुरवठा योजना ही केवळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आहे. तिचा ‘एमआयडीसी’शी कोणताही संबंध नाही. नगरपालिका एमआयडीसीला पाणीपुरवठा करू शकत नाही. असे असताना विरोधकांकडून या योजनेबाबत गैरसमज पसरवून राजकारण केले जात आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला. नवापूर येथील रंगावली मध्यम प्रकल्पातून ‘अमृत २.०’ योजनेंतर्गत ९३.१३ कोटी रुपये खर्चाच्या नवीन नळपाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश काढण्यात आला आहे. या योजनेला विरोध दर्शवत नवापूरात नुकताच मोर्चा काढला होता. याबाबत विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, ‘एमआयडीसी’च्या पाण्याचे आरक्षण स्वतंत्र आहे. एमआयडीसी स्वतः पाणीपट्टी भरून पाण्याची उचल करते. नगरपालिकेच्या हक्काचे आरक्षित पाणी पूर्वी नदीपात्रात सोडले जात होते. मात्र, नदीपात्र कोरडे असल्याने नवापूर शहरापर्यंत केवळ २५ टक्के पाणी पोहोचत होते. नवीन योजनेमुळे स्वतंत्र पाइपलाइनद्वारे हे पाणी थेट नवापूर शहरापर्यंत पोहोचणार असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रंगावली धरणात ‘एमआयडीसी’चे स्वतंत्र पाणी आरक्षित असल्याचे संबंधित कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रातून स्पष्ट होते. त्यामुळे योजनेबाबत वस्तुस्थिती समजून न घेता विरोध करणे योग्य नाही, असेही आमदार रघुवंशी म्हणाले. योजना मंजूर करून वचनपूर्ती नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीला शहरातील नागरिकांनी बहुमत दिले. नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाची परतफेड करणे ही आमची जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीने अवघ्या सहा महिन्यांत ९३.१३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवून आणली आहे. या योजनेला इतक्या कमी कालावधीत मंजुरी मिळेल, अशी विरोधकांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल, असा टोला आमदार रघुवंशी यांनी लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला मंजुरी दिल्याने नवापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT