Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Swami Samarth Sevamarga : श्री.स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे हवनात्मक नवनाथ पारायण व दत्त नवनाथ पूजन

सकाळ वृत्तसेवा

Swami Samarth Sevamarga : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात तीन दिवसीय हवनात्मक श्री नवनाथ पारायण व श्री दत्त नवनाथ पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनात ८ ते १० सप्टेंबर या काळात नवनाथ पारायण होणार आहे. (Navnath Parayana and Datta Navnath Pujan From 8th September in Shri Swami Samarth Seva Marg nashik news)

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ही भगवान श्री शिव, गंगा-गोदावरी, दत्त महाराज अर्थात श्री स्वामी महाराज आणि नवनाथांची पुण्यभूमी आहे. संत निवृत्तिनाथांना गहिनीनाथांनी याच भूमीत दीक्षा दिली होती.

हे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लक्षात घेऊन भाविकांना श्रावण महिन्यात वैयक्तिक व राष्ट्रहितासाठी विशेष सेवा करता यावी या उद्देशाने परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हवनात्मक नवनाथ पारायण सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या पारायणात भूपाळी आरती, श्रीरुद्राभिषेक, हवनात्मक नवनाथ पारायण, श्री शाबरी कवच पठण, श्रीविष्णुसहस्त्रनाम पठण, सांस्कृतिक कार्यक्रम, बटूरुपी नवनाथ पूजन, श्री दत्त पादुका पूजन, श्रीदत्त नवनाथ पूजन या विशेष सेवा व उपक्रमांचा समावेश आहे.

सेवेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून सेवेकऱ्यांची भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्यांनी श्री नवनाथ भक्तीसार, नित्यसेवा, श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथ, श्रीविष्णुसहस्त्रनाम पोथी, आदी ग्रंथसंपदा व इतर साहित्य आणावयाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT