नाशिक

संक्षिप्त- धुळे टुडे १ साठी...

CD
संक्षिप्त- धुळे टुडे १ साठी... ------- नवोदयमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ धुळे : पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, नकाणे रोड, धुळे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता नववी व अकरावीच्या प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा- २०२७ साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आता १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती उपप्राचार्य अनिता चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. इयत्ता नववी व अकरावीच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा- २०२७ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून प्रवेश परीक्षा १० एप्रिल २०२७ ला होणार आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज संकेतस्थळ https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11 तसेच इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी अर्ज संकेतस्थळ https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9 या संकेतस्थळांवर १५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. निवड चाचणीबाबत अधिक माहितीसाठी गोकुल धनगर अथवा नितीन पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपप्राचार्य श्रीमती चौधरी यांनी केले आहे. --- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी कार्यशाळा धुळे : धुळे कोषागार कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत जनजागृती व मार्गदर्शनासाठी मंगळवारी (ता. ६) सकाळी अकराला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन इमारतीतील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) हे ऑनलाइन माध्यमातून सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी वि. दे. डाखोरे यांनी दिली. या कार्यशाळेत ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपच्या विविध सुविधांची माहिती, तसेच त्याच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनातील सर्व निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डाखोरे, नितीन नंदन, अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. --- धुळे जिल्ह्यात मनाई आदेश धुळे : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक मनाई आदेश मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये लागू राहतील असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शरद पवार यांनी दिले आहेत. हे आदेश पाच पेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणूकीस मनाई करील. या कालावधीत सभा, मिरवणूका, मोर्चा, मिटींग कार्यक्रम व रॅली आदी परवानग्यांबाबत स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन परवानगी घ्यावी. तसेच, लग्नकार्य किंवा अंत्ययात्रेच्या जमावास शासनाने वेळोवेळी दिलेले निर्बंध लागू असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT