नाशिक

नवरात्रोत्सवानिमित्त बाजारात रेलचेल; गरबा-दांडियासाठी आकर्षक पेहरावांना पसंती

CD
ॲंकर NSK26H31442 जळगाव : नवरात्रोत्सवासाठी घागरा पाहताना तरुणी. --- गरबा-दांडियासाठी आकर्षक पेहरावांना पसंती नवरात्रोत्सवानिमित्त बाजारात रेलचेल; पारंपरिक वेशभूषेची तरुणाईला भुरळ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः गरबा-दांडियासाठी लागणारे आकर्षक पारंपरिक पेहराव, रंगीबेरंगी चनिया चोळी, कुर्ते, जॅकेट, दागिने आणि विविध सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. तरुणाईमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येत असून, गरबा-दांडियाच्या तयारीला वेग आला आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करण्याची परंपरा अनेकांकडून जपली जाते. त्यामुळे महिलांसाठी घागरा-चोळी, चनिया चोळी, ऑक्सिडाइज्ड दागिने, कंबरपट्टा, बांगड्या, कानातले यांना मागणी आहे. तरुणांसाठी केडियू, कुर्ता, धोती, रंगीबेरंगी जॅकेट आणि पारंपरिक फेटे उपलब्ध झाले आहेत. यंदा पारंपरिक वेशभूषेसोबत आधुनिक फॅशनचा मिलाफ असलेल्या पोशाखांकडे तरुणाईचा कल दिसत आहे. विविध रंगसंगती, आकर्षक नक्षीकाम, मिरर वर्क आणि भरतकाम असलेल्या कपड्यांनी दुकानांमध्ये लक्ष वेधले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सायंकाळच्या वेळेत विशेष गर्दी होत असून, व्यापाऱ्यांनाही खरेदीच्या वाढत्या उत्साहामुळे दिलासा मिळत आहे. चौकट/ग्राफ नवरात्रोत्सवासाठी कपड्यांचे दर (अंदाजे किंमत) चनिया चोळी ८०० ते ३,५०० डिझायनर घागरा-चोळी १,५०० ते ५,००० गरबा कुर्ता ५०० ते १,८०० केडियू (पुरुषांसाठी) ७०० ते २,५०० पारंपरिक जॅकेट ५०० ते १,५०० दांडिया काठ्या (जोडी) १०० ते ४०० रंगीबेरंगी बांगड्या ५० ते ३०० पारंपरिक फेटा १५० ते ५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधी, प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT