धुळे : टुडे पान २ साठी.. मेन ( सुधारित बातमी )
--
फोटो क्रमांक : 31884, 31886, 31887
धुळे : शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी दाखल श्री दुर्गादेवीच्या आकर्षक मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेच्या तयारीसाठी मातीचे घट, पूजा साहित्य, ओटीचे कपडे आणि नारळ खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग. तर शेवटच्या छायाचित्रात देवीच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांची खरेदी करताना भाविक. ( छायाचित्रे : गोरख गर्दे )
--
जिल्ह्यात आदिशक्तीच्या स्वागतासाठी तयारी पूर्ण
--
शारदीय नवरात्रोत्सव : घटस्थापनेने चैतन्य, देवी मंदिरांत विद्युत रोषणाई, भाविकांची लगबग
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : आदिशक्ती आणि स्त्रीशक्तीच्या उपासनेचा पवित्र उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (ता. ११) भक्तिभावात प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी आणि मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करून देवीच्या आराधनेला सुरुवात केली जाणार आहे. या नऊ दिवसांच्या काळात शहर आणि जिल्ह्यात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार असून देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळणार आहे.
-
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समित्यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध मंदिरांची परिसर स्वच्छता, आकर्षक सजावट आणि पूजेची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वच मंदिरांवर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाल्याचे दिसून येत आहे. घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले असून, देवीच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना करून आदिशक्ती दुर्गामातेची आराधना केली जाते. त्यामुळे घटस्थापनेपूर्वी पूजेचे साहित्य खरेदी करायला भाविकांकडून प्राधान्य दिले जाते. बाजारपेठेत घट, नारळ, फुले, हार, कुंकू, हळद, अगरबत्ती, दिवे, पूजेची ताटे यासह विविध साहित्य उपलब्ध झाले असून शनिवारी (ता. १०) साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. घटस्थापनेसाठी घटाचे महत्त्व आहे. सध्या बाजारात घट दाखल झाले असून, ३० रुपयांना घट, दुरडी ४० रुपयांना आहे, तर पाच धान्यांची रासची पुढी दहा रुपयांना आहे. याशिवाय देवीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंचीही मगणी आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
विविध धार्मिक कार्यक्रम
उत्सवादरम्यान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, आरती, भजन, कीर्तन तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाईल. उपवास, जप, पारायण, आरती आणि गरबा-दांडियाच्या माध्यमातून जिल्ह्यात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी दांडियाचे आयोजन केले आहे. त्यामुळे दांडिया खेळण्यासाठी अनेकांकडून बुकिंग केली जात आहे. परिणामी, दांडिया खरेदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे. विजयादशमीच्या दिवशी दसरा साजरा करून या उत्सवाची सांगता होईल. भक्ती, श्रद्धा आणि शक्तीच्या या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.