मेनला जोड
13184
वणी ः जगदंबामाता मंदिरात घटस्थापनाप्रसंगी उपस्थित सरपंच मधुकर भरसट, बाळकृष्ण भामरे, रोशन जहागीरदार, सुधीर दवणे आदी.
वणी येथे हजारावर
महिला बसल्या घटी
वणी ः सप्तशृंगी देवीची भगिनी असणाऱ्या जगदंबा मातेच्या नवरात्रोत्सवासही आजपासून प्रारंभ झाला. देवी मंदिरात हजारावर महिला घटी बसल्या आहेत. दरम्यान, गावांतील नवरात्रोत्सव मंडळांनी विविध ठिकाणच्या देवींची स्थापना केली.
येथील जगदंबामाता मंदिरात सकाळी नऊला देवीची पंचामृत अभिषेकपूजा पुरोहित सुधीर दवने यांनी केली. सरपंच मधुकर भरसट, महसूल अधिकारी बाळकृष्ण भामरे यांचे हस्ते सपत्नीक पूजा होऊन विधिवत घटस्थापना केली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, पोपटराव थोरात, बाळासाहेब देशमुख, रोशन जहागिरदार, राकेश थोरात, गणेश देशमुख, अमोल देशमुख, रमेश देशमुख, रविंद्र थोरात, सुरेश देशमुख, मनोज थोरात, सुनील थोरात आदी उपस्थित होते. दरम्यान, मराठा समाजाच्या पहिल्या माळेचे साडी, अभिषेक व आरतीचे मानकऱ्यांकडून पूजाविधी करण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबामाता मंदिरासह महादेव मंदिर, संतोषी माता मंदिर, गणेश मंदिर, श्री हनुमान मंदिर तसेच प्रवेशद्वारास रोषणाई करण्यात आली. मंदिरालगत असलेल्या मंडपात शेकडो महिला घटी बसल्या. घटी बसलेल्या महिला व भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहाची सुविधा, वस्त्रातंर गृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज पहिल्या माळेस दिवसभरात सुमारे पंधरा हजारावर भाविकांनी दर्शन घेतले. नवरात्रोत्सवात सकाळी सातला महापूजा, सायंकाळी सहाला पालखी, सातला आरती, तर रात्री आठला भक्तीसंध्या होणार आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.