नाशिक

दुर्गादेवीच्या मूर्तीही १२ फुटांपर्यंत उंच!

CD
सेकंड मेन --- NSK26H31646 (फोटो ३ कॉलम वापरावा) जळगाव : देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरविताना महिला कारागीर. (छायाचित्र : संधिपाल वानखेडे) -------------- दुर्गादेवीच्या मूर्तीही १२ फुटांपर्यंत उंच (उपशीर्षक) नवरात्रोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग; विविध रुपांतील देवीच्या मूर्तींना पसंती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची चाहूल लागली आहे. चार दिवसांवर नवरात्रोत्‍सव आल्‍याने शहरातील मूर्तिकारांकडे दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा दुर्गादेवीच्या मूर्तींमध्येही उंचीचा ट्रेंड पाहायला मिळत असून, काही मंडळांसाठी तब्बल १० ते १२ फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यात येत आहेत. उंचीसह पारंपरिक रूपासह विविध आकर्षक रूपांतील देवीच्या मूर्तींना मंडळांकडून पसंती मिळत आहे. नवरात्रोत्‍सवाची तयारी सुरू झाली असून गरबा, दांडीयाचे आयोजन करणाऱ्या मंडळांची देखील तयारी सुरू झाली आहे. त्‍यानुसार नवरात्रोत्सवासाठी शहरासह परिसरातील सार्वजनिक मंडळांकडून मूर्तींची आगाऊ नोंदणी केली जात आहे. मंडळांच्या मागणीनुसार मूर्तींची उंची, चेहऱ्यावरील भाव, अलंकार आणि रंगसंगती निश्चित केली जात आहे. त्यामुळे मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या दिवसरात्र काम सुरू आहे. मागणीनुसार उंची गणेशोत्‍सवात यंदा सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या १८ ते २० फूट उंचीच्‍या गणेश मूर्तींची प्रतिष्‍ठापना करण्यात आल्‍या होत्‍या. त्‍यानुसार नवरात्रोत्‍सवा दुर्गादेवीच्‍या उंच मूर्तींना पसंती दिली जात आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून मोठ्या आकाराच्या मूर्तींना मागणी होत आहे. त्यानुसार काही मूर्ती ८ ते १० फुटांच्या, तर काही ठिकाणी १२ फुटांपर्यंतच्या तयार केल्या जात आहेत. मंडळांच्या सजावटीचा आकार आणि उपलब्ध जागा लक्षात घेऊन मूर्तीची उंची निश्चित केली जात आहे. इन्‍फो सजावटीचीही तयारी मूर्तींसोबतच नवरात्रोत्सव मंडळांकडून मंडप, रोषणाई आणि देखाव्याची तयारी सुरू झाली आहे. रविवारी (ता.११) घटस्‍थापना असल्‍यामुळे आगामी काळात बाजारपेठेत देवीच्या मूर्तींसह सजावटीच्या साहित्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Ramdas Athawale on Gyanesh Kumar : 'ज्ञानेश कुमार काहीही झाले तरी राजीनामा देणार नाहीत'; अभिजीत दीपकेंच्या आंदोलनावर रामदास आठवले स्पष्टच बोलले, दिला कडक इशारा

Pune News : खेळाच्या मैदानावरील अनधिकृत इमारत महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात; ९ ऑक्टोबरला माघारीची अंतिम मुदत

Uruli Kanchan News : पोलिसांच्या कर्तव्य भावनेने मजूर दांपत्याला मिळाला आधार! खाकी वर्दीतील माणुसकी आली धावून

Ishan Kishanने मोडला विराट कोहलीचा १० वर्षे जुना विक्रम; भारतीय खेळाडूंच्या 'या' लिस्टमध्ये अव्वल

SCROLL FOR NEXT