पान-२ मेन
रेणुका मातेचा फोटो घेणे....
रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
पाच लाख भाविकांचा अंदाज; ४८ सीसीटीव्हींची नजर
सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. ९ ः येथील श्री रेणुका देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, रविवार (ता. ११)पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात सुमारे पाच लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असून, भाविकांची सुरक्षितता आणि सुविधांना प्राधान्य देत मंदिर प्रशासन व विविध यंत्रणांकडून नियोजन केले जात आहे.
भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन व्हावे, यासाठी मंदिर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. दर्शनासाठी माथ्याकडून आणि पायथ्याकडून अशा दोन स्वतंत्र रांगा असतील. मंदिर रात्री एकपर्यंत खुले राहणार असून, दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, वीज, मोठे स्क्रीन, स्वच्छतागृह आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा घटस्थापनेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी अपेक्षित आहे. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी सहा सभागृहांत एक हजाराहून अधिक भाविकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे ५०० महिला घाटी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी सहसभागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या पायथ्याशी तसेच परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पार्किंग, मनोरंजनाची साधने आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवरही सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय, मंगरूळ सीमा टोलनाका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
भाविकांसाठी भाऊ फाउंडेशनतर्फे १५ हजार चौरस फुटांचा दर्शन रांग डोम, निवारा शेड आणि मोफत खिचडी वाटपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. देवीचा गाभारा चांदीचा करण्यात आला असून, पायऱ्या बंद करून जाण्यासाठी प्रशस्त मार्ग तयार करण्यात आला आहे.
............
चौकट
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
नवरात्रोत्सवात रोज पहाटे पाचला महाभिषेक, आरती, पालखी मिरवणूक तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. अष्टमी व नवमीला होमहवन होणार आहे. भाविकांना गर्दीची माहिती मिळावी, यासाठी मंदिर प्रांगणात एलईडी व प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोठे दिवे आणि दहा सौर पथदीप बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसरात पुरातत्त्व विभाग व राज्य शासनाच्या माध्यमातून कामे सुरू आहेत.
................
दोन स्वतंत्र दर्शन रांगा
मंदिराच्या माथ्यावरून आणि पायथ्याकडून अशा दोन स्वतंत्र दर्शन रांगा राहणार आहेत. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी सहा सभागृहांत एक हजाराहून अधिक भाविकांची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापक एम. के. पवार व सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.
................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.