Navratri festival ended at Saptashrangi gad nashik Marathi News  Sakal
नाशिक

नाशिक : सप्तशृंगगडावर आदिमायेच्या नवरात्रोत्सवाची सांगता

दिगंबर पाटोळे


वणी (जि. नाशिक) :
आदिमाया सप्तशृंगीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची शुक्रवारी (ता. १५) विजयादशमीस शतचंडी यागास पूर्णाहुती देऊन सांगता झाली. दसरा उत्सवही झाला. सप्तशृंगगड ग्रामस्थांतर्फे पहिली पायरी चौकात पारंपरिक पद्धतीने बोकडबळी देत पूर्णाहूती विधी करण्यात आला.

सप्तशृंगगडावर आदिमायेच्या शिखरावर मध्यरात्री मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयातील सदस्यांनी कीर्तीध्वज फडकविला. शुक्रवारी सकाळी कीर्तीध्वजाचे सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांनी दर्शन घेतले. गुरुवारी (ता.१४) महानवमीनिमित्त देवीमंदिर सभामंडपात दुपारी शतचंडी याग सुरू झाला होता. यजमान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा न्यासाचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांनी सपत्नीक यागात आहुती दिली. पुरोहित संघाच्या सर्व सदस्यांनी यज्ञविधीत सहभाग घेत मंत्रघोषात मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात यज्ञविधी केला. रात्री कोहळ्याचा बळी विधिवत पूजन करून देण्यात आला. शुक्रवारी सकाळी नऊला शतचंडी यागास पूर्णाहुती, आदिमायेची पंचामृत महापूजा व महाआरतीही ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन देसाई यांनी सपत्नीक केली. सप्तशृंगीगड ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. सकाळी गडावर घटी बसलेल्या महिला भाविकांनी कीर्तिध्वजाचे दर्शन, आदिमायेस नैवद्य देऊन बसविलेले घट विसर्जित केले. दुपारी देवीस पुरणपोळी, वरण-भात, भाजी आदी पदार्थांचा नैवद्य देऊन आरती झाली. त्यानंतर उत्साहाची सांगता झाली.

दरम्यान, पाच वर्षांपासून देवीमंदिर परिसरात प्रथेनुसार होणाऱ्या बोकडबळी व हवेत गोळीबार करण्याच्या प्रथेस बंदी कायम आहे. कोरोना नियमावलींचे पालन करून भक्तांगण हॉलसमोरील होमकुंड मंडपात गुरुवारी (ता.१४) ग्रामस्थांतर्फे स्वतंत्र नवचंडी याग झाला. शुक्रवारी शिवालय तलावापासून बळीचा बोकड व मानकऱ्यांची परंपरेनुसार साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. पहिल्या पायरीवर बोकड्याचे व मानकऱ्यांचे विधिवत पूजन करून पहिली पायरी चौकात बोकडबळी देण्यात आला. नंतर गडावर विजयादशमी उत्सव भाविकांनी उत्साहात साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT