नाशिक

वर्गणी मागणार्या तरुणावर चाकूने हल्ला

CD
वर्गणी मागणाऱ्या तरुणावर चाकूने हल्ला; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : आगामी नवरात्रोत्सवासाठी वर्गणी जमा करत असताना जुन्या वादाच्या आणि संशयाच्या कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना प्रजापत नगरात घडली. या हल्ल्यात जखमी तरुणाच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कांचननगर येथील रहिवासी आणि गॅरेज मेकॅनिक प्रतीक भावलाल उमराळे (वय ३०) हे रविवारी (ता. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास प्रजापत नगर (सात खोल्यांजवळ) येथे देवीची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. प्रजापत नगरातील सोपान महाजन यांच्या घरासमोर पोहोचले असता, कांचन नगर (प्रशांत चौक) येथील रहिवासी संशयित गणेश उर्फ काळ्या रवींद्र सोनवणे आणि अजय कोल्हे यांनी प्रतीक यांना अडवले. ‘तू आकाशच्या नातेवाईकांना वकिलांकडे का घेऊन जातोस, असे बोलून संशयितांनी वाद घातला. त्यानंतर दोघांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान अजय कोल्हे याने प्रतीकला धरून ठेवले, तर गणेश उर्फ काळ्या याने कंबरेतून चाकू काढून प्रतीकच्या डाव्या मांडीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच गोळ्या घालून ठार करेल अशी धमकी दिली. चौकट जखमी रुग्णालयात या घटनेनंतर जखमी प्रतीक उमराळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस नाईक प्रदीप राजपूत तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३०० रुपये घेतले नाही, ४०० थेट खिशात घातले; RTO पोलिसाच्या 'वसुली'चा व्हिडीओ व्हायरल

अमिताभ बच्चन यांना वकिलाची कायदेशीर नोटीस; KBC मधील 'त्या' प्रश्नावरून नवा वाद, नेमकं प्रकरण काय?

Road Accident: कारची बैलाला धडक; दुचाकीस्वाराचा बळी ,बिथरलेल्या बैलाच्या शिंगाने छातीला गंभीर दुखापत

Overloaded Sugarcane Trucks: उसाच्या ओव्हरलोडिंगने रस्‍त्‍यांवर अपघातांचे सत्र; नियमांची पायमल्ली अन् यंत्रणाही ढिम्म

Unseasonal Rain: दुष्काळाच्या झळांनंतर अवकाळीचा घाला ,रामटेकचा बळीराजा दुहेरी संकटात; ढगाळ वातावरणामुळे धास्ती वाढली

SCROLL FOR NEXT