नाशिक

गरब्याचा ठेका अन पांरपारिक वेशभूषेचा रंग!

CD
फोटो : H31414 गरब्याचा ठेका अन्‌ पांरपारिक वेशभूषेचा रंग! राजकोट, जामनगरच्या कलाकुसरीची भुरळ; पारंपारिक गरबा ड्रेसला मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : गरब्याचा ठेका, दांडियाची धूम आणि त्याला साजेशी पारंपरिक वेशभूषा, नवरात्रोत्सवात गरबाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असताना आता आकर्षक पारंपारिक गरबा ड्रेसला मागणी वाढली आहे. मात्र, केवळ नवरात्रोत्सवापुरता वापर होणारा ड्रेस खरेदी करण्यापेक्षा तो भाड्याने घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यामुळे चनिया चोली, घागरा चोली, जॅकेट, केडिया, अँकल केडिया, कोटी, पगडी अशा विविध पारंपरिक वेषभूषांनी बाजारपेठेत रंग भरला आहे. गरबा आणि दांडिया खेळताना वेशभूषेला विशेष महत्त्व असते. आकर्षक रंग, पारंपरिक नक्षीकाम आणि विविध प्रकारच्या डिझायनर पोशाख गरबा प्रेमींचे लक्ष वेधून घेतात. मात्र, हे पोशाख खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी पोषाख भाड्याने घेण्याचा पर्याय अनेकांना सोयीचा ठरत आहे. गुजरातची पारंपरिक नृत्यशैली असलेल्या गरब्याचे आकर्षण देशभरात आहे. नाशिकमध्येही विविध मंडळांच्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमांना गर्दी होत असते. त्यासोबतच अनेक ठिकाणी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या स्पर्धांमध्ये वेगळे आणि आकर्षक दिसण्यासाठी गरबा प्रेमी नवरात्रोत्सवापूर्वीच पोशाखाची तयारी करतात. गरबा ड्रेसमध्ये हाताने केलेल्या कलाकुसरीला विशेष मागणी असते. गुजरातमधील राजकोट, जामनगर आदी भागांत कपड्यांवर हाताने नक्षीकाम करणारे कारागीर आजही कार्यरत आहेत. त्यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने पाेषाख तयार करून घेतले जातात. गरबा ड्रेस भाड्याने घेण्यासाठी साधारणपणे एका दिवसासाठी पाचशे ते एक हजार रुपये मोजावे लागतात. दुपारी बारा वाजता ड्रेस घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत तो परत करावा लागतो. गरब्याचा आनंद लुटण्याची क्रेझ दरवर्षी वाढत असल्याने भाडेतत्त्वावरील गरबा ड्रेसच्या व्यवसायालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. --- कोट फोटो : H31413 बारा वर्षांपासून गरबा ड्रेस भाड्याने देण्याचा व्यवसाय करते आहे. कपडे भाड्याने देताना त्यांच्या स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक ड्रेसची स्वच्छता कटाक्षाने पाळली जाते. अगदी एक वर्षाच्या बाळापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण आवडीने गरबा वेशभूषा घेऊन जातात. दरवर्षी नवरात्रोत्सवात या ड्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. -मनाली रहाणे, रूपश्री गरबा ड्रेसेस -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Action Pune : भेसळखोरांचे धाबे दणाणले! अन्न नमुन्यांचे अहवाल आता १४ दिवसांत येणार; जिममधील 'प्रोटीन पावडर' विक्रीवरही तुकाराम मुंढेंचा कडक इशारा

मोठी बातमी! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी, बेलापूर न्यायालयात खळबळ

India A vs UAE: आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये उद्या भारतासमोर यूएईचं आव्हान! सेमीफायनलचं तिकीट पणाला, वैभवच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये पोलीस कोठडीत २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या? अटकेच्या दुसऱ्याच दिवशी उचलले टोकाचे पाऊल

COP31 Climate Summit Collapse Turkey : तुर्कीयेमधील संयुक्त राष्ट्रांची 'कॉप ३१' हवामान परिषद फिस्कटली! जीवाश्म इंधनांच्या मुद्द्यावरून मोठे मतभेद, मुख्य कराराविनाच चर्चा संपली

SCROLL FOR NEXT