नाशिक

देवी भगवतीच्या नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना

CD
मेन फोटो : B61056, B61051 -- घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ घरोघरी, मंदिरांमध्ये आदिशक्तीचा जयघोष; विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : घरोघरी आदिमाया भगवतीच्या घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास रविवार (ता. ११) पासून सुरुवात झाली. अभिजित मुहूर्त साधत अनेकांनी घटस्थापना केली, तर सांडव्यावरची देवी, भद्रकाली माता, घनकर लेन व डांगर उतारावरील तुळजाभवानी मंदिरांमध्ये अनेक गृहिणीदेखील घटी बसल्या आहेत. देवीमातेचे नवरात्र साजरे करण्यासाठी घटी बसण्याची परंपरा आहे. मंगळवारी (ता. २०) दसऱ्याला उपवासाचे पारणे फेडण्यात येईल. नवरात्र प्रारंभास घरोघरी घट स्थापन करण्यात येतो. घटाजवळ उगवणाऱ्या धान्याच्या रूपाने सृजन होते. चैतन्याची ही पखरण माणसातील तेज जागवते आणि जीवनातील संघर्षाला तोंड देण्यासाठी तो सज्ज होतो. देवी भगवतीच्या आशीर्वादातूनच हे सहज शक्य होत असल्याने घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीदरम्यान नाशिक शहरातील पुरातन मंदिरांमध्ये देवीची उपासना करण्यात येते. यात दुर्गा सप्तशती पाठ, देवी अथर्वशीर्ष पाठ तसेच नवार्णव मंत्राची साधना महत्त्वाची असून अनेकजण गोदाघाटावरील सप्तशृंगी मंदिरामध्ये या साधनेसाठी बसतात. नऊ दिवसांमध्ये झालेल्या साधनेची विजयादशमीच्या दिवशी घटाच्या विसर्जनाने सांगता करण्यात येते. व्यंकटेश बालाजी ब्रह्मोत्सव आणि पद्मावती देवी नवरात्रोत्सवास गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. न्यासाचे विश्वस्त संजय चंद्रात्रे यांच्या हस्ते बालाजींची तर विश्वस्त आर्कि समृद्ध मोगल यांच्या हस्ते पद्मावती पूजनाचा शुभारंभ करण्यात आला. बालाजी मूर्तीस आकर्षक पुष्प सजावट आणि मंदिरास नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत संपन्न होणाऱ्या उत्सवात दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शंकराचार्य न्यासातर्फे करण्यात आले आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT