नाशिक

‎नवरात्रोत्सवात झेंडूला मागणी वाढण्याची शक्यता

CD
‎फोटो - 16060 येसगाव : झेंडूंनी बहरलेले शेत. ----- नवरात्रोत्सवात झेंडूला मागणी वाढण्याची शक्यता ‎दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन घटणार; भाव वाढण्याची शेतकऱ्यांना आशा सकाळ वृत्तसेवा ‎येसगाव, ता. ८ : ग्रामीण भागात यंदा पावसाअभावी अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना जेमतेम पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी  हायब्रीड झेंडूची लागवड केली आहे. काही ठिकाणी ठिबक सिंचनवर झेंडू लावलेली दिसतात. कसमादे पट्ट्यात काही भागात ठिकठिकाणी झेंडूची लागवड दिसून येते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूना मोठी मागणी राहण्याची शक्यता असल्याने या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‎नवरात्रोत्सवात घटस्थापना, देवीची पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी व दसरा सणासाठी, झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे या काळात झेंडूला बाजारपेठेत चांगली मागणी मिळते. यंदा अनेक भागांत पाण्याची कमतरता असल्याने झेंडूचे क्षेत्र तुलनेने कमी राहिले आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त राहिल्यास झेंडूच्या भावात वाढ होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. ‎पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या झेंडूच्या पिकाला सध्या चांगली वाढ झाली असून, नवरात्रोत्सवाच्या काळात उत्पादन बाजारात येणार आहे. त्यामुळे यंदाचा झेंडूचा बाजार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. बाजारपेठेत शंभर ते दीडशे रुपये किलोचा भाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‎

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT