नाशिक

नवरात्रोत्सवासाठी आदिमायेचा सप्तशृंगगड सज्ज.

CD
नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर प्लॅस्टिकबंदी ग्रामपंचायतीकडून व्यावसायिकांवर होणार कारवाई कळवण, ता. ९ ः नवरात्रोत्सवात सप्तशृंगगडावर प्लॅस्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गडावर प्लॅस्टिक पिशव्या बाळगणाऱ्या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दुकान सील करण्याचे आदेश प्रशासन व ग्रामपंचायतीस देण्यात आले आहेत. भाविकांनीही प्लॅस्टिकच्या पिशव्या आणू नये, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. ट्रस्टतर्फे फेनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात टप्प्याटप्प्याने सोडण्याची व्यवस्था असून, दर तासाला पाच ते सहा फेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे. कोजागरी पौर्णिमा उत्सवानिमित्त २५ व २६ ऑक्टोबरला कावडधारकांचे अभिषेक व दर्शन संपेपर्यंत फेनिक्युलर ट्रॉलीची सुविधा राहणार आहे. गडावर यात्रा कालावधीत फक्त राज्य परिवहन मंडळाच्याच बसची वाहतूक सुरू राहणार असून, नाशिक विभागातील १३ आगारांतर्गत वेगवेगळ्या बसस्थानकांतून विशेष बस थेट गडापर्यंत धावतील. नांदुरी व गडावरील धोंड्या-कोंड्या विहिरीजवळ तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले असून, तेथे प्रवाशांना निवाराशेड व तात्पुरत्या प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात नांदुरीच्या पायथ्यापासून घाटाने गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खासगी वाहनांना बंदी असणार आहे. खासगी वाहनाने येणाऱ्या भाविकांना नांदुरी येथून पर्यायी बसगाडीची व्यवस्था असेल. गेल्या वर्षी महामंडळातर्फे दोनशे बसगाड्यांची व्यवस्था केली होती. सध्या उत्सवकाळातील जादा वाहतुकीकरिता महामंडळाकडून नियोजन केले जात आहे. वन विभागाने यात्रा कालावधीत माकडांचा उपद्रव होऊ नये, यासाठी दोन लोखंडी पिंजरे, रोप वे ट्रॉली व सतीचा कडा या परिसरात ठेवण्यात आले आहेत. ............. चौकट मंदिर २४ तास खुले उत्सवकाळात मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले राहणार आहे. भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी यात्रा कालावधीत मोफत महाप्रसादाची व्यवस्था, तसेच सशुल्क भोजन कक्ष सुरू करण्यात आले आहे. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

Maharashtra Live News : सीईसीविरोधातील आंदोलनांप्रकरणी सात दिवसांत २७ एफआयआर दाखल

नवरा असावा तर फडणवीसांसारखा! पती अन् मुलीसमोर अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं, असं केलं बायकोचं कौतुक

Kaygaon News : कायगाव परिसरात ऊसतोडणी हंगामाची चाहूल; ऊसतोड मजूर दाखल, मात्र दुष्काळाने उसाची वाढ खुंटली, उत्पादन घटणार

SCROLL FOR NEXT