नाशिक

सप्तशृंगगडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दीड हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात;

CD
टुडे पान-१ साठी--मेन करणे ग्राफिक्स करणे, VNI26B13135-- एआय फोटो --------------------- नवरात्रीत गडावर ३११ सीसीटीव्ही कॅमेरे ------------- भाविकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ः बारा लाखांवर भाविक येण्याची शक्यता ----------- दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा वणी, ता.६ : श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर पोलिस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या नवरात्रोत्सवात व २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यानच्या कोजागिरी उत्सवासाठी १२ ते १३ लाख भाविक अपेक्षित असल्याने कायदा-सुव्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियमनासाठी दीड हजारांहून अधिक पोलिस, महिला पोलिस व होमगार्डचे मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. गडावरील हालचालींवर ३११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. ------------------ नवरात्रोत्सवासह कोजागिरी पौर्णिमा उत्सवही निर्विघ्न पार पाडण्यासाठी संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कुमक तैनात केली जाणार आहे. पायरी मार्ग, मंदिर प्रवेशद्वार, दर्शन रांगा, एसटी बसस्थानक, रोप-वे परिसर, वाहनतळ तसेच नांदुरी येथे गर्दी नियंत्रणाला प्राधान्य देण्यात आले आहे. भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सोडण्यासह महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी, दागिने चोरी अथवा अन्य गैरप्रकार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे पथक कार्यरत राहणार आहे. मंदिर परिसरातील ३११ सीसीटीव्हींचे नियंत्रण कक्षातून निरीक्षण केले जाणार असून संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने कारवाई केली जाणार आहे. १६-१ अत्याधुनिक साधनसामग्री - गर्दी नियमनासाठी सुमारे २०० बॅरिकेड्स, २५ वॉकी-टॉकी, १५ टॉर्च, १५ राहुट्या, दोन वायरलेस संच, तीन दुर्बिणी, १० मेगाफोन/पीए सिस्टीम आणि १० दोरखंड उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी पाच शासकीय वाहने, दोन शासकीय क्रेन, २० दुचाकी, दोन पाच टनी वाहने आणि पाच रिकव्हरी वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत. १६-१ वाहतुकीवरही कडक नियंत्रण नांदुरी-सप्तशृंगगड मार्गावरील वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन स्वतंत्र वाहतूक यंत्रणा कार्यरत राहणार आहे. गर्दीच्या काळात खासगी वाहनांवरील निर्बंध, वाहनतळ व्यवस्था आणि भाविकांच्या वाहतुकीचे नियोजन काटेकोरपणे राबविले जाणार आहे. १६-१ अफवा पसरविणाऱ्यांवर नजर उत्सवकाळात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, चुकीची माहिती आणि अफवांवर सायबर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी पोलिस, प्रशासन व मंदिर संस्थानाच्या सूचनांचे पालन करून शिस्तबद्ध दर्शन घ्यावे आणि गर्दी नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. १६-१ नियोजित पोलिस बंदोबस्त मनुष्यबळ संख्या अपर पोलिस अधिकारी १ पोलिस उपअधीक्षक २ पोलिस निरीक्षक १७ पोलिस उपनिरीक्षक ४१ पोलिस कर्मचारी ३१८ महिला पोलिस कर्मचारी १०० पुरुष होमगार्ड ८०० महिला होमगार्ड २०० एसआरपीएफ १ प्लाटून आरसीपी २ वाहतूक शाखा २ अधिकारी, ३० कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखा २ अधिकारी, २० कर्मचारी अग्निशमन दल १ जीवरक्षक दल १ आपत्ती व्यवस्थापन टिम - १ -------------

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Japanese Hair Care: जपानी महिलांच्या सिल्की-शायनी केसांचे रहस्य काय? १ रुपयाही खर्च न करता ट्राय करा 'या' ६ सोप्या ट्रिक्स...

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT