नाशिक

नवरात्रोत्सवाला सुरुवात, बाजारपेठेत चैतन्य

CD
आदिशक्तीच्या आगमनाने बाजारपेठा गजबजल्या वाहन, सोने खरेदीचा ओघ; इतरही व्‍यवहारांना चालना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेपासून नाशिकमधील मुख्य बाजारपेठांमध्ये ग्राहकांची पावले वळू लागली आहेत. खरेदीचा नवा उत्साह सध्या पाहायला मिळत आहे. पितृपक्ष पंधरवड्यातील शांततेनंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर बाजारपेठेतील मरगळ पूर्णपणे झटकली गेली असून व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. रविवार कारंजा, मेन रोड, दहीपूल, एमजी रोड आणि पंचवटीतील बाजारपेठांमध्ये सकाळपासून ग्राहकांची वर्दळ दिसून आली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानांवर आकर्षक रोषणाई केली असून विविध सवलतींचे फलक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. घटस्थापनेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य, तोरणे, रांगोळी, फळे आणि फुलांच्या खरेदीसाठी नाशिककरांनी सकाळी मेनरोड व पंचवटी परिसरात गर्दी केली होती. दसरा आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी कंपन्‍यांच्‍या दालनात नोंदणीचा ओघ वाढला आहे. चारचाकी वाहनांसोबत दुचाकी आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची मोठी पसंती मिळते आहे. अनेक दालनांमध्ये आकर्षक कर्जपुरवठा योजना, सवलत योजनेसह इतर सवलतींमुळे ग्राहकांची रेलचेल सुरू आहे. दुसरीकडे, मोबाईल, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रिज यांसारख्या गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सणासुदीच्या योजना जाहीर झाल्याने इलेक्ट्रॉनिक्स दालनांमध्येही कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे. पितृपक्षातील मंदी दूर होऊन नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल सुरू झाली आहे. दसरा आणि पाठोपाठ येणाऱ्या दिवाळीपर्यंत हा खरेदीचा उत्साह असाच कायम राहील, असा विश्वास स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. --- सराफ बाजाराला झळाळी सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असले, तरी सणासुदीच्या खरेदीसाठी सराफ बाजारात विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. पारंपरिक दागिन्यांसोबत हलक्या वजनाचे दागिने, सोन्याची नाणी आणि चांदीच्या पूजेच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. पुढील नऊ दिवसांत आणि विशेषतः दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खरेदीचे नियोजन करून अनेक नागरिक आगाऊ नोंदणी करत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. --- पारंपरिक पोशाख, सजावट साहित्याला मागणी दांडिया आणि गरब्यासाठी लागणारे पारंपरिक पोशाख, कुर्ते तसेच आधुनिक फॅशनच्या कपड्यांच्या खरेदीसाठी तरुणाई कॉलेज रोड, मेनरोड परिसरात धाव घेत आहे. यासोबत घरगुती घटस्थापनेसाठी लागणारे मखर आणि सजावटीच्या साहित्याची मोठी विक्री होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT