navratri special article on jagdamba mata nashik esakal
नाशिक

Jagdamba Mata : सप्तशृंगीमातेची थोरली बहीण जगदंबा माता

सकाळ वृत्तसेवा

आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या वणी गडावरील सप्तशृंगीमातेचे मूळ रूप व थोरली बहीण म्हणून वणी गावातील जगदंबा मातेस संबोधले जाते. महिषासुराच्या त्रासाला कंटाळलेल्या भक्तांना या राक्षसापासून मुक्ती देण्यासाठी वणीतील जगदंबेने सप्तशृंगीचे रूप घेतले.

या रूपात सप्तशृंगीने महीषासुराचा वध केला. दुष्टशक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे वणीच्या जगदंबा मातेला सप्तशृंगीचेच मूळ रूप मानतात.

वणीच्या जगदंबा देवीची मूर्ती पार्वतीबाई पुणेकर यांनी स्थापन केली आहे. पेशवाईत व अहिल्याबाईंच्या काळात परिसरात सुंदर हेमाडपंती मंदिर व कुंडे बांधली आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. (navratri special article on jagdamba mata nashik)

१९१३ मध्ये देशमुख व थोरात कुटुंबीयांनी पंचांच्या मदतीने लगद्यापासून मूर्ती स्थापन केली. त्या वेळी गावावर येणाऱ्या संकटाचे रक्षण व्हावे, यासाठी नवरात्रात देवीसमोरील होमात रेड्याचा बळी देण्याची प्रथा सुरू झाली.

संपतराव देशमुख हे स्वत: बळी देत. १९३२ मध्ये संपतरावांना स्वामी अवघडानंद महाराजांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रेड्याचा बळी देण्याची प्रथा बंद करून त्याऐवजी कोहळ्याला बळी देण्याची प्रथा सुरू केली. दरम्यानच्या काळात मूर्ती झिजल्याने १९२८ मध्ये पुन्हा कागदी लगद्याची मूर्ती बसविली; परंतु तीही जीर्ण झाल्याने १९५१ मध्ये तांब्याच्या धातूपासून बनविलेली तेजस्वी, आकर्षक व मनोहारी पूर्वाभिमुख देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

जगदंबा देवीच्या मूर्तीखाली १० ते १२ फूट खोलीवर स्वयंभू चार चिरंजीव आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश व नारायण हे देवीचे चार पुत्र समजले जातात. या खोलीत त्यांच्या शीळा असून, ही खोली हळद-कुंकू, गुलाल व भंडाऱ्याच्या जाड थराने भरण्यात आली आहे. त्यावर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. माहूरच्या रेणुका देवीप्रमाणे जगदंबेची फक्त शीराची मूर्ती येथे आहे.

असे म्हटले जाते, की देवीच्या तीर्थकुंडात ब्रह्मा, विष्णू, महेश व ऋषिसंतांनी तर्पणविधी केला होता. त्यामुळे या परिसराला आगळेवेगळे महत्त्व आहे. देवीच्या मूर्तीची उंची सहा फूट असून, डोक्यावर चांदीचा मुकुट, कानात चांदीची कर्णफुले, नाकात मोती जडलेल्या सोन्याची नथ, गळ्यात मंगळसूत्र असा साजशृंगार असून, देवीला पूर्ण नऊवार पातळ लागते.

वणी गडावरील सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाप्रमाणेच वणी गावातही यात्रा भरते. या यात्रेसाठी राज्यातील तसेच गुजरातमधील हजारो भाविक पदयात्रेने दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवात देवी मंदिर परिसरात हजारो महिला भाविक घटी बसतात. घटी बसलेल्या महिलांसाठी मंदिर व्यवस्थापन पाहणारे श्री सप्तशृंगीदेवी ट्रस्ट (वणी)तर्फे मोफत निवास सुविधा, मोफत फराळ व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

गडावर सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेतल्यावर वणी गावातील जगदंबादेवीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण दर्शन व नवसपूर्ती पूर्ण होत नसल्याचा समज भाविकांमध्ये असल्याने परंपरेनुसार गडावर येणारे भाविक येथील जगदंबादेवीचे दर्शन घेतल्यावर मार्गस्थ होतात. तसेच, नवसपूर्तीसाठी सोयीचे ठिकाण असल्याने अशा भाविकांचे नवसपूर्ती कार्यक्रम कायम सुरू असतात. त्यामुळे सप्तशृंगगडाप्रमाणेच येथेही भाविकांची सतत वर्दळ असते.

त्यांच्यासाठी येथे श्री सप्तशृंगी (जगदंबा) देवी ट्रस्टतर्फे भव्य भक्तनिवास बांधण्यात आलेला असून, निवास आणि धार्मिक विधी यांची अल्पदरात व्यवस्था केली जाते. दररोज सकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत भाविकांना श्री जगदंबेचे दर्शन घेता येते. नवरात्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले असते. दररोज सकाळी सातला पंचामृत महापूजा व नऊला आरती, दुपारी बाराला माध्यान्ह आरती व सायंकाळी साडेसातला सांज आरती होते.

(शब्दांकन : दिगंबर पाटोळे, वणी, ता. दिंडोरी)

ठळक वैशिष्ट्ये

वणीजवळील तीर्थक्षेत्रे व शहरे

@ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड : २३ किलोमीटर

@ श्रीक्षेत्र शंखेश्वर पार्श्वनाथ (वणी) : १ किलोमीटर

@ सापुतारा : ३५ किलोमीटर

@ मार्कंडेय पर्वत : ८ किलोमीटर

@ पाराशरी आश्रम (पारेगाव) : १५ किलोमीटर

@ ओझरखेड धरण : ५ किलोमीटर

@ करंजी देवस्थान : ८ किलोमीटर

@ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक प्रधान केंद्र (दिंडोरी) : १७ किलोमीटर

@ मार्कंडेय पिंप्री देवस्थान : २५ किलोमीटर

@ नाशिक येथून जुन्या मध्यवर्ती बसस्थानकातून दर अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने बस

@ खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात

@ भक्त निवासाची उत्तम सुविधा

@ संपर्क : देवस्थान ट्रस्ट : ७०२०६६८९६३, ९५५२३७३१०१

@ मंदिर लोकेशन : https://g.co/kgs/uSNrTL

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

Kelva Beach: वीकेंडला निसर्गाचा आनंद घ्यायचा? मग डहाणू ट्रेनने निघा आणि थेट ‘केळवा बीच’वर पोहोचा

Maharashtra Politics:'सुशीलकुमार शिंदेंच्या गुगलींवर शरद पवारांचा गुड लेफ्ट'; बॅटिंग टाळली, जुन्या आठवणींना उजाळा..

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

SCROLL FOR NEXT