नाशिक

नवरात्रीत सुरळीत वाहतूकीला प्राधान्य द्यावे : प्रसाद

CD
नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीचा ‘विशेष आराखडा’ गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेडिंग, पर्यायी मार्ग; आपत्कालीन व्यवस्थेसाठी यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : नवरात्रोत्सवाच्या काळात सप्तशृंगगड, चांदवडसह विविध ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. उत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ६) नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी प्रसाद बोलत होते. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, कळवणच्या प्रांताधिकारी डॉ. कश्मिरा संखे, चांदवडचे प्रांताधिकारी कैलास कडलग, कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व सप्तशृंगी देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. सप्तशृंगगड व चांदवड येथे प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि उत्सवस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर आवश्यकतेनुसार वाहतूक नियमन, बॅरिकेडिंग आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी. नवीन रस्त्यांवर दिशादर्शक व सूचना फलक लावावेत. आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे प्रसाद यांनी सांगितले. वन्यजीवांच्या संरक्षणासाठीही आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. माकडांसह पक्ष्यांना खाद्य देण्याचे प्रकार टाळण्यासाठी संवेदनशील ठिकाणी जनजागृतीपर सूचना फलक लावावेत, असेही त्यांनी सांगितले. समन्वयाने जबाबदारी पार पाडा : स्वामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर नवरात्रोत्सवाचे नियोजन करताना सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी केले. एखाद्या विभागाच्या अधिकाऱ्याला अन्य विभागाशी संबंधित समस्या उद्भवल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तातडीने समन्वय साधावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT