Coconuts esakal
नाशिक

Navratrotsav 2022 : श्रीफळ खाणार ‘भाव’!; 2 वर्षांच्या तुलनेत यंदा मागणीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

बिजोरसे (जि. नाशिक) : दोन वर्ष गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाशी संबंधित सर्वच व्यवसायांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला होता. सर्व मंदिरे, यात्रोत्सव, धार्मिक पूजा यंदा सुरू झाल्या. गणेशोत्सवात पूजा व तोरणासाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली. गणेशोत्सवात नारळ विक्रीत दोन वर्षाच्या तुलनेने २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Navratrotsav 2022 Increase in coconut demand compared to 2 years Nashik Latest Marathi News)

किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत २० ते ३० रुपयांदरम्यान आहे. कोरानामुळे धार्मिक उत्सवांवर निर्बंध असल्यामुळे नारळ विक्रीवर परिणाम झाला होता. आता निर्बंध नसल्याने नारळ विक्रीत वाढ झाली आहे. तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून नारळांची आवक मोठ्या प्रमाणात कसमादे पट्ट्यात होते. तमिळनाडूतून नव्या नारळांची आवक होत आहे. कर्नाटकातून येणाऱ्या ‘मद्रास सापपोल’ जातीच्या नारळाला मागणी आहे.

नारळाचे दर (शेकडा)

प्रकार दर (रुपयांमध्ये)
नवा नारळ १२५० ते १४५०
पालकोल १४०० ते १६००
मद्रास २२०० ते २६००
सापसोल १८०० ते २३००

"आंध्रप्रदेशातून ‘पालकोल’ जातीच्या नारळाची आवक होते. खाद्य पदार्थांमध्ये नारळाचा वापर होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी असते. पितृपक्षात विक्रीचे प्रमाण काहिसे कमी झाले. पुढील आठवड्यापासून नवरात्रोत्सव सुरू होणार असून, सर्व मंदिरे खुली करण्यात आल्याने नारळाच्या मागणीत वाढ होईल." - संजय राणा, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT