नाशिक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार

CD
नवरात्रोत्सवाची देणगी शेतकरी कुटुंबीयांना सुपूर्द ‘विचार वारसा फाउंडेशन’चा उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : यंदाच्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन स्थानीक आमदार राजूमामा यांच्या वतीने करण्यात आले होते. या हाकेला प्रतिसाद देत रामेश्वर कॉलनी परिसरातील ''विचार वारसा फाउंडेशनने यंदाचा नवरात्रौत्सव सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विचार वारसा फाउंडेशन संचलित नवदुर्गा सार्वजनिक नवरात्री उत्सवाच्या काळात दुर्गा मातेच्या दर्शनासाठी व भव्य आरास पाहण्यासाठी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या उत्सवादरम्यान जमा होणारी संपूर्ण देणगी व निधी दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी दिली. फाउंडेशनच्या या संवेदनशील आणि स्तुत्य निर्णयाला संपूर्ण मित्र परिवाराने एकमताने पाठिंबा दिला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष राजपूत, मयूर डांगे, मनीष चौधरी, संकेत म्हस्कर, गितेश पवार, अमोल ढाकणे, अभिजित राजपूत, गौरव डांगे, ऋषी राजपूत आदी सदस्य व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

SCROLL FOR NEXT