Officials present at the meeting of NCP Sharad Pawar faction on Monday.  esakal
नाशिक

Nashik NCP News : नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा! शहर-ग्रामीण आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून मागणी

‘इंडिया’ आघाडीतून एक-एक पक्ष बाहेर पडत असताना राज्यात स्थानिक पातळीवर ‘इंडिया’त सहभागी असलेल्या महाविकास आघाडीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘इंडिया’ आघाडीतून एक-एक पक्ष बाहेर पडत असताना राज्यात स्थानिक पातळीवर ‘इंडिया’त सहभागी असलेल्या महाविकास आघाडीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या (ठाकरे गट) नाशिकच्या जागेवर दावा केला असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ग्रामीण व शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाशिकच्या जागेवर दावा केला. (NCP claims for Nashik seat Demand from office bearers in urban rural review meeting political news)

जिल्ह्याचे प्रभारी आमदार सुनील भुसारा यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मुंबई नाका कार्यालयात सोमवारी (ता. २९) बैठक झाली. शहर-जिल्हाध्यक्ष गजानन शेलार अध्यक्षस्थानी होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिक जिल्हा प्रभारीपदी आमदार भुसारा यांची नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भुसारा यांनी बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

पक्षबांधणी, पुढील काळात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दृष्टीने मार्गदर्शन केले. पक्षबांधणीसाठी शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले.

नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी, अशी पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली. शेलार यांनी पक्षफुटीनंतर शहरातील पक्षबांधणी अत्यंत चांगल्या रीतीने झाल्याने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले, माजी आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष छबू नागरे, शहर महिलाध्यक्षा अनिता दामले, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण मंडाले, ‘मविप्र’ माजी संचालक सचिन पिंगळे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सामाजिक न्याय शहराध्यक्ष राजेंद्र पवार, ग्रामीण युवक अध्यक्ष श्याम हिरे, ग्रामीण विद्यार्थी अध्यक्ष ॲड. तुषार जाधव, शहर विद्यार्थी अध्यक्ष भावनेश राऊत, विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील-मोगल, धनंजय रहाणे, विभाग अध्यक्ष प्रवीण नागरे, सचिन आहेर, विजय मटाले, संजय गालफाडे, कविता पवार, रूपाली काटे, माधुरी ओहोळ, प्रदेश पदाधिकारी जयंतकुमार आहेर, भारत जाधव, शादाब सय्यद, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष संकेत गायकवाड, गणेश नवले, राहुल निफाडे, प्रवीण बैसाणे आदी उपस्थित होते. प्रवीण नागरे यांनी सूत्रसंचालन केले. युवक शहराध्यक्ष नितीन निगळ यांनी आभार मानले.

महाविकास आघाडीसमोर अडचणी

महाविकास आघाडीतीशिवसेना व राष्‍ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना फुटीचा सामना करावा लागत आहे. यामुळे दोन्ही पक्षांची संघटना पातळीवर कसोटी लागली आहे.

एकीकडे दोन्ही पक्ष स्वत:ची ताकद वाढवत असताना दुसरीकडे मित्रपक्षांच्या जागांवर नजर ठेवली जात आहे. नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे असल्याने त्या अनुषंगाने शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे.

जिल्हाप्रमुख विजय करंजकर त्यांचे उमेदवार असतील. करंजकर यांनी तयारीही सरू केली आहे, असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या जागेवर दावा सांगितल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वादाला फोडणी मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : म्हाडाच्या मुंबईतील 149 दुकानांचा आज लिलाव

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT