Nashik News Esakal
नाशिक

Nashik News : राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर प्राणघातक हल्ला; पोलिसांचा तपास सुरू

हल्ला कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव पवार यांच्या कन्या आणि नाशिकमधील प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार काल (मंगळवारी 13 डिसेंबर) संध्याकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या हल्ल्यामध्ये प्राची पवार गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राची पवार या मंगळवारी रात्री गोवर्धन शिवारात असलेल्या आपल्या फार्म हाऊसवर गेल्या होत्या. यावेळी हल्लेखोरांपैकी दोघेजण फार्म हाऊसलगतच्या झाडीत लपून बसले होते.

प्राची पवार या दुचाकीवरून फार्म हाऊसजवळ आल्या असता, त्यांनी या लोकांना गाडी काढण्यासाठी सांगितलं. तेव्हा, हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्राने प्राची यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं आहे.

दरम्यान, प्राची पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ला कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याचे कारण अस्पष्ट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT