NCP esakal
नाशिक

...हा तर एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न!

अंबादास देवरे

सटाणा (जि. नाशिक) : येथील माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी गेल्या १ मे २०२१ रोजी महाराष्ट्रदिनी सटाणा शहराला पुनंद धरणाचे पाणी देण्याची घोषणा केली होती. ती हवेतच विरली आणि आता पालिकेत प्रशासक असताना शहराला पाणीटंचाई भासल्यास शहराला पुनंद धरणाचे पाणी द्यावे, अशी केविलवाणी मागणी ते करीत आहेत. हा फक्त दिखाऊपणाचा एक भाग असून, शहरवासीयांना एप्रिल फुल बनविण्याचा डाव आहे का, असा थेट प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे व सरचिटणीस नितीन सोनवणे यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

पत्रकात म्हटले आहे...

श्री. मोरे नगराध्यक्ष असताना गेल्या तीन वर्षांपासून पुनद पाईपलाईनचे काम चालू आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच घाईघाईत जलपूजन केले. पुनंद योजनेचे काम आजही अपूर्ण आहे. मग, गेल्यावर्षी १ मेला पाणी देण्याचे आश्‍वासन कोणत्या आधारावर दिले. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून तीनवेळा ठेकेदारांना मुदतवाढ देऊनही नगराध्यक्षपदी असेपर्यंत शहरवासीयांना पुनंदचे पाणी देऊ शकले नाहीत, हे मोरे यांचे मोठे अपयश असल्याचा ठपकाही पत्रकात ठेवण्यात आला आहे. पालिकेत प्रशासन बसले तेव्हाच मोरे यांना शहरात पाणीटंचाई का दिसू लागली, आपले अपयश झाकण्यासाठी शहरातील पाणीटंचाईचे खापर पालिका प्रशासनावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न श्री. मोरे करीत आहेत. पुनंदचे काम पूर्ण झालेले नसताना प्रशासनाला टंचाईकाळात पुनंदचे पाणी शहरवासीयांना देण्याचा सल्ला म्हणजे जनतेची दिशाभूल असल्याचा आरोपही श्री. सोनवणे द्वयींनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ५ किलोमीटरमधील कमी पटाच्या शाळांचे दुसऱ्या शाळेत होणार समायोजन; शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे राज्यातील २५० शाळांचे भवितव्य अंधारात

सासू-सासऱ्याच्या संपत्तीत सून किंवा जावयाला हक्क असतो का? नातवंडाला आजी-आजोबाची इस्टेट मिळते का? वाचा...

Iran vs Israel युद्ध आणखी भडकणार! इराणला पाठिंबा देत हिजबुल्लाहचे इस्रायलवर हल्ले, इस्रायलचा लेबनॉनच्या राजधानीतही विध्वंस

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

Holi Special Breakfast: होळीच्या दिवशी विशेष नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा बॉल्स; रेसिपी एकदम सोपी आहे

SCROLL FOR NEXT