National Defence Academy
National Defence Academy esakal
नाशिक

NDA Exam : सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षणाच्‍या अर्जाची या तारखेपर्यंत मुदत; प्रवेशासाठी येथे करा अर्ज..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) (NDA) च्‍या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी राज्‍य शासनाची सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्‍था (एसपीआय) कार्यरत आहे. (NDA exam army pre service training Application deadline is 12 march nashik news)

इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासोबत एनडीए परीक्षेची तयारी या संस्‍थेतून करुन घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेशासाठी परीक्षा व मुलाखतीद्वारे संस्‍थेत प्रवेश दिले जाणार आहेत. परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शनिवार (ता.१२) पर्यंत आहे.

आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर येथील ‘एसपीआय’ या संस्‍थेतून साडेपाचशेहून अधिक उमेदवारांची ‘एनडीए’ च्‍या परीक्षेत निवड झालेली आहे.‘एनडीए’चे दार मुलींसाठीदेखील खुले झाले असल्‍याने या वर्षीपासून प्रथमच नाशिक शाखेत मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.

त्‍यामुळे मुलांप्रमाणे मुलींनाही प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. संस्‍थेतर्फे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्‍यानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांना या शनिवारपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

दरम्‍यान, भारतात पहिली शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिक येथे सुरू झालेली आहे. संस्थेत प्रथम सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, निवड झालेल्‍या विद्यार्थिनींना महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच केंद्रीय विद्यालयातून अकरावी, बारावीचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्‍ध करुन दिली जाणार आहे.

मुलींनी या संकेतस्‍थळावर करावा अर्ज- www.girlspinashik.com

मुलांनी या संकेतस्‍थळावर करावा अर्ज- www.spiaurangabad.com

निवड प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे असे-

* ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया-------१२ मार्चपर्यंत

* परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्‍ध होणार------३० मार्च

* लेखी परीक्षेचे आयोजन--------------------९ एप्रिल

पात्रतेच्‍या अटी अशा-

- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी तसेच अविवाहित असावा.

- विद्यार्थ्याचा जन्‍म १ जुलै २००६ ते ३१ डिसेंबर २००८ या दरम्‍यानचा असावा.

- विद्यार्थी इयत्ता दहावीतील असावा.

"विद्यार्थिनींना सैनिकीपूर्व प्रशिक्षणासाठी नाशिक शाखा कार्यान्‍वित झालेली असून, ही मुलींना मोठी संधी उपलब्‍ध झालेली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा संपल्‍यानंतर लगेचच तयारी सुरू केली तर परीक्षेत चांगली कामगिरी करता येऊ शकते. प्रवेशासाठी वाढती स्‍पर्धा लक्षात घेता, योग्‍य मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे." - हर्षल आहेरराव, संस्‍थापक, सुदर्शन अॅकॅडमी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT