NDCC Bank Nashik esakal
नाशिक

NDCC Bank News : जिल्हा बॅंकेकडून 455 संस्थांची कमाल मर्यादा पत्रके मंजूर!

विकास सोसायट्यांच्या पीककर्ज मंजूरीची ७८१ प्रकरणे सादर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा बॅंकेतर्फे येत्या १ एप्रिलपासून खरीप पिक कर्ज वाटपाचा हंगाम सुरु होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत बँकेस ७८१ विविध कार्यकारी संस्थांची कमाल मर्यादा पत्रके प्राप्त झाली असून, ४५५ संस्थांची कमाल मर्यादा पत्रके केंद्र कार्यालयातून मंजूर करून संबधीत शाखांमध्ये पाठविली आहेत. उर्वरीत पत्रके ३१ मार्चपर्यंत मंजुरी देण्याचे नियोजन बँक प्रशासनाने केले आहे. (NDCC Bank District Bank approves maximum limit sheets of 455 institutions nashik News)

जिल्हा बँकेला शासनाने २०२२-२३साठी खरीप पीककर्ज वितरणाचे ५१५ कोटींचे लक्षांक दिले होते. बँकेने हा लक्षांक पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना ५२ हजार सभासदांना ४६४ कोटींचे म्हटजे ८० टक्के पीककर्ज वाटप केले आहे.

त्यामुळे सभासदांनी २०२३-२४ साठी पिक कर्ज उचलण्यास पात्र होऊन शासनाच्या तीन लाखांपर्यंत पिक कर्जावरील व्याजाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जुने कर्ज परतफेड करावी.

कर्जदार सभासदांसाठी संबधीत विकास संस्थेत, शाखेत हिशोब मिळण्याची सुविधा आहे. ३० मार्चला सुटीच्या दिवशीही बँकेच्या शाखेत कर्जवसुलीचे कामकाज सुरु राहणार असल्याचे बॅंक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

जिल्हा बँकेला दिलासा

थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने टॉप १०० सभासदांची यादी जाहीर केली होती. यातील पहिल्या १४ थकबाकीदारांपैकी ४ सभासदांनी थकबाकी भरली आहे. माजी संचालक गणपतराव पाटील यांच्या कुटुंबाकडे १४ कोटींची थकबाकी होती.

त्यासाठी जिल्हा बँकेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाटील कुटूंबाने थकीत कर्ज भरण्याची तयारी दाखवत मंगळवारी (ता. २८) कुटूंबाकडे असलेल्या सर्व कर्ज खात्यांमधील थकबाकीपोटी जिल्हा बँकेत ८ कोटी रूपये जमा केले.

यात पाटील यांच्याकडे असलेल्या एकूण कर्जाचे सहा कोटी ५३ लाख, विद्याताई पाटील यांच्या कर्जखात्याचे ५५ लाख, दत्तात्रय पाटील यांच्या कर्जखात्यात एक कोटी १५ लाखांचा धनादेश जिल्हा बँकेत जमा केला आहे. या मोठ्या कर्जवसुलीमुळे जिल्हा बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT