The current building of the municipality and in the second photo, the counter standing citizens and establishment department.
The current building of the municipality and in the second photo, the counter standing citizens and establishment department. esakal
नाशिक

Nashik News : कालबाह्य ठरलेल्या पालिका इमारतीचे रुपडे पालटण्याची आवश्यकता

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (जि. नाशिक) : पालिकेच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झालीत. त्या पालिकेच्या इमारती मधून दाटीवाटीने कोंबण्यात आलेल्या विभागातून प्रशासनाचा कारभाराचा गाडा चालविला जात आहे. शिवाय जुन्या इमारतीच्या बांधकामाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पालिकेशी निगडित कामे करून घेण्यासाठी येणाऱ्या सामान्य जनतेला काउंटरवर उभे राहून कामे करून घेण्याची वेळ आली आहे. कार्यालय व दालनासाठी जागा अपूर्ण पडत असल्याने नांदगाव पालिकेला देखील मनमाड प्रमाणेच नवीन इमारतीची आवश्‍यकता तयार झाली आहे. (Need to makeover outdated municipal building of nanadgaon Nashik News)

नांदगाव नगरपालिकेची सध्याची इमारत ज्याठिकाणी आहे ते अवघ्या पाच हजार स्केअरफूट आहे. त्यात वरच्या मजल्यावर सभागृह असून या सभागृहाला संलग्न केवळ नगराध्यक्षसाठी स्वतंत्र दालन आहे.

मात्र उपनगराध्यक्षाला नगराध्यक्षांच्या शेजारी स्वतःचे आपले दालन नसल्यामुळे खुर्ची टाकून बसावे लागते. स्थायी समितीसह एकूण सहा विषय समित्या असूनही त्यातील विषय समितीच्या सभापतींना मात्र एकही दालन नाही.

विरोधी गटाचे नेतेपद निर्माण झालेले नाही. अन्यथा आणखी एक दालन वाढवावे लागले असते. वरच्या मजल्यावर नगराध्यक्षांचे दालन असले तरी त्याला अँटीचेंबर नाही. मात्र मुख्याधिकाऱ्यांना खालील मर्यादित जागेत आस्थापनासमोर स्वतंत्र दालन दिलेले आहे.

नागरीकरणाच्या संबंधातून विषय घेऊन येणाऱ्या शिष्टमंडळाला जर ते पाच किंवा सात जणांचे असेल तर ठीक हेच शिष्टमंडळ मोठ्या संख्येचे असेल मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दाटीवाटी करण्याची वेळ लोकांवर येत आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

शहरातले रखडलेले नागरीकरण व हाकेच्या अंतरावर हद्दीची झालेली लचकेतोड याचाही भार आता यंत्रणेच्या दैनंदिन कामकाजावर पडत आहे. अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा मागितली जाते. त्यामुळे जागा द्यायच्या असतील कशा व कुठून दिल्या जातील याबाबत मतभिन्नता आहे.

पालिकेचे सर्व विभाग मिळून एकूण ३४ पदे आस्थापनेवर मंजूर असून त्यात चार पदे रिक्त आहेत नजीकच्या काळात संभाव्य होणारी हद्दवाढ लक्षात घेता या सहा ग्राम पंचायतीकडील असणाऱ्या सेवक-कर्मचाऱ्यांची सेवा पालिकेत वर्ग करावी लागणार असल्याने त्यांना

सध्याच्या आहे त्या इमारतीच्या क्षेत्रफळात नव्याने जागा देणे बंधनकारक असल्याने कामकाजाचा भार पालिकेला सोसायचा आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता सध्याची इमारत निर्लेखित करून नव्या क्षेत्रफळात अद्यावत इमारत करण्याची गरज आता भासू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT