कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना सीमा कोनाळे. Sakal
नाशिक

बालविवाहविरोधात काम करण्याची गरज : डॉ. प्रमोद पांढरे

बालविवाह निर्मूलन प्रशिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करून जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी, मुलींना सक्षम करण्यासाठी, कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्य विभागातील गटप्रवर्तक, आशावर्करांनी पुढे येऊन एकत्रितरीत्या बालविवाह विरोधात काम करण्याची गरज असल्याचे, प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांनी केले.

महिला व बालविकास विभाग, युनिसेफ व सेंटर फॉर सोशल अॅण्ड बिहेविअर चेंज कम्युनिकेशन (एसबीसी ३) यांच्यातर्फे महाराष्ट्रातील बालविवाह निर्मूलनासाठी आरोग्य विभागातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील गटप्रवर्तक व आशांचे एकदिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शाहू महाराज सभागृहात झाले. त्याच्या उद्‌घाटनावेळी डॉ. पांढरे बोलत होते. जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, जिल्हा समूह संघटक प्रवीण जगताप, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, युनिसेफ एसबीसी-३ चे सीमा कोनाळे, नंदू जाधव आदी उपस्थित होते. जिल्हा समूह संघटक जगताप म्हणाले, की बालविवाह निर्मूलनासाठी पंचायत विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष या विभागांसोबत एकत्रितरीत्या काम करून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यावेळी बालविवाह प्रतिबंध अधिनियम तसेच बालविवाहाची कारणे, परिणाम याबाबत सखोल माहिती देण्यात आली. जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करू अशी सर्व सहभागींनी शपथ घेतली. प्रशिक्षणाचा समारोप करतेवेळी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र तसेच पेन ड्राईव्ह व मॅन्यूअल इत्यादी प्रशिक्षण साहित्य देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Dharmendra Pradhan salary : केंद्रीय कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांवर सरकारचा दरमहा किती खर्च? धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून समजून घ्या

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT