Neelam Gorhe  sakal
नाशिक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

जातीय तेढ जेव्हा निर्माण होतो, त्यातून युवक वैफल्यग्रस्त होतात आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या होतात.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जातीय तेढ जेव्हा निर्माण होतो, त्यातून युवक वैफल्यग्रस्त होतात आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या होतात. बँकांची भूमिका देखील यात भर घालत असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत असताना राज्यातील युवक, शेतकरी आत्महत्या होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी नाशिकमध्ये आलेल्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘शेतकरी आत्महत्या करतात, हे बरोबर असले तरी कृषी क्षेत्रात चांगल्या गोष्टीही घडतात.

त्या दुर्लक्षित राहतात. त्याकडे लक्ष देण्याची खरी समाजाला गरज आहे.’’ सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ४४ हजार कोटींचा निधी दिला. कपडे, घर, दुकानदार यांच्यासाठी २७ कोटी ९३ लाखांची मदतही केली. महिला धोरण असेल किंवा शीतगृह उभारणीसाठी भरीव मदत सरकारने केली आहे, असे त्यांनी सांगितले.

महायुतीला ४५ पेक्षा अधिक जागा

लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यात महायुतीला ४५ पेक्षा अधिक जागा मिळतील. ‘ईव्हीएम’वर संशय घेऊन विरोधक आतापासूनच भुई बडवण्याचे काम करत आहेत. त्यात शरद पवारांनी छोट्या पक्षांबाबत केलेले विधान ऐकल्यानंतर अजिबात आश्‍चर्य वाटले नाही. कारण जागा जिंकता येत नाहीत असे वाटते तेव्हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची त्यांची जुनी सवय असल्याची टीकाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT