NEET Exam Latest Marathi news esakal
नाशिक

NEET Exam : नीट अर्जाची वाढीव मुदत उद्यापर्यंत; विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी NTAचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

NEET Exam : वैद्यकीय शाखांतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षेचे आयोजन केले आहे. मे महिन्‍यात नियोजित असलेल्‍या या परीक्षेच्‍या नोंदणीला नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे वाढीव मुदत दिलेली आहे.

त्‍यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवार (ता.१३) पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. (NEET application deadline extended till tomorrow NTA decision to give opportunities to students nashik news)

एमबीबीएस, बीडीएस, फिजिओथेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीसह अन्‍य वैद्यकीय शाखांतील पदवी अभ्यासक्रम व बी.एस्सी. (नर्सिंग) आदी पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नीट २०२३ ही परीक्षा घेतली जाणार आहे.

देश व विदेशातील ४९९ परीक्षा केंद्रांवर येत्‍या ७ मेस होणार असलेल्‍या या परीक्षेसाठी यापूर्वीच नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आलेले आहे. परंतु कुठलाही विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी पुन्‍हा एकदा नोंदणीची संधी एनटीएच्‍या माध्यमातून उपलब्‍ध करून दिलेली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्‍यानुसार यापूर्वी नोंदणी अपूर्ण असलेल्‍या विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. तसेच आत्तापर्यंत नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांना नव्‍याने नोंदणी करण्याची संधी उपलब्‍ध असणार आहे.

गुरुवारी (ता.१३) रात्री साडे अकरापर्यंत ऑनलाइन अर्ज स्‍वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन शुल्‍क भरण्यासाठीची मुदत याच दिवशी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT