A net cover on Sagar Bhamre's pomegranate garden.
A net cover on Sagar Bhamre's pomegranate garden. esakal
नाशिक

Nashik News: डाळिंब बागेला वाचविण्यासाठी अनोखी शक्कल! वाढत्या उन्हापासून डाळिंबचे फळ वाचविण्यास मदत

- दीपक खैरनार

Nashik News : गेल्या अनेक वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कधी अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट तर कधी ढगाळ वातावरण यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उन्हाचा देखील मोठा फटका बसत आहे. वाढत्या उन्हापासून बागा संरक्षित करण्यासाठी काटवन परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने बागेवर अच्छादन केले असून वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे फळ वाचविण्यास मदत होणार आहे. (net cover to save pomegranate garden Help to save pomegranate fruit from rising sun Nashik News)

कजवाडे (ता.मालेगाव) येथील युवा शेतकरी सागर सुरेश भामरे यांच्या रामपुरा शिवारातील वडिलोपार्जित असलेल्या माळरानावरील चार एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असतानादेखील त्यांनी मोठ्या हिमतीवर बागेला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शेततलावाची सोय केली आहे.

पावसाळ्यात तलावात पाण्याची साठवन होत असल्याने त्यातून डाळिंब बागेला पाणी पुरविले जाते. बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाच्या बागा संकटात सापडल्या असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकत आहे.

दरम्यान वाढत्या उन्हापासून डाळिंबाची बागा संरक्षित करण्यासाठी आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून डाळिंब उत्पादक युवा शेतकरी सागर भामरे यांनी केलेल्या प्रयोगाची काटवन परिसरात चर्चा होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

श्री. भामरे यांनी बाजारपेठेतून संपूर्ण डाळिंब बागेला संरक्षित करण्यासाठी नेटची खरेदी केली व आपल्या चार एकर क्षेत्रातील बागेला नेटने आच्छादन पसरविले आहे. यामुळे वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे फळ वाचण्यास मदत होणार आहे.

तसेच बाग वाचविण्यासाठी सुधारित पद्धतीच्या आच्छादनाचा वापर करता येत असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

"दरवर्षीपेक्षा यंदा जास्त उन्हाळा जाणवत आहे. सततचे वातावरण बदलामुळे डाळिंब बागेला धोका निर्माण झालेला आहे, त्यात अवकाळी पाऊस व गारपिटीपासून संरक्षणासाठी आम्ही डाळिंबावर नेटचा वापर केलेला आहे. डाळिंब बागेवर नेटच्या संरक्षणामुळे डाळिंब बागेवर येणारे रोग जसे तेलकट टाक यांचा सुद्धा प्रसार कमी होतो."

- सागर भामरे, डाळिंब उत्पादक, कजवाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT